सडोली खालसा येथील सेवा निवृत्त संघटने मार्फत व्यसनमुक्ती प्रतिज्ञा दिन साजरा

सावरवाडी प्रतिनिधी :
करवीर तालुक्यातील सडोली खालसा येथे सेवानिवृत्त संघटनतर्फ सेवा निवृत्त लोकांचा सत्कार, गुणवंत व्यक्ती, कोविड योध्रांचा सन्मान करण्यात आला . कार्यक्रमानिमित्या गावात , वृक्षारोपण, ग्रामसफाई, व्यसनमुक्ती असे विविध उपक्रम घेण्यात आले .
कार्यक्रम प्रसंगी डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन करून अध्यापक एकनाथ कुंभार व प्राचार्य डॉ विलास पाटील यांना शिक्षक दिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी बोलतांना एकनाथ कुंभार म्हणाले वैचारिक तत्वज्ञानाची बैठक नव्या पिढीत आणणे गरजेचे आहे . त्यांना प्रबोधनाचे तत्वज्ञानाची ओळख करुन देणे गरजेचे आहे . यावेळी विलास पाटील यांनी स्वतःचे आरोग्य कसे जपावे याबद्दल कानमंत्र सांगितला.
यावेळी उपस्थितांना तंबाखू मुक्तीची शपथ महात्मा गांधी व्यसन मुक्ती व्यसनमुक्ती राज्य पुरस्कार विजेते अध्यापक श्री एकनाथ कुंभार यांनी दिली. यावेळी चित्र प्रदर्शन ही भरवण्यात आले होते.
कार्यक्रमाचे अध्यक्ष बळवंत कुंभार हे होते. प्रास्ताविक मारुती साळोखे यांनी तर आभार मधुकर कुंभार यांनी मानले. यावेळी अध्यापकांनी सेवानिवृत्त सदस्यांना गांधी टोपी व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला
कार्यक्रम प्रसंगी ग्रा पं सदस्य जयसिंग कुंभार, शिवाजी चव्हाण, सखाराम पाटील, शंकर पाटील,महादेव पोवार,नायकू कुंभार,संजय पाटील,बळवंत पाटील,संभाजी पाटील,महादेव मगदूम, मुख्याद्यापक नेर्लेकर यांनी आदि उपस्थित होते .