ताज्या बातम्यामहाराष्ट्र

गारगोटी एस टी आगाराचा सुवर्णमहोत्सवी वर्धापनदिन उत्साहात साजरा

गारगोटी प्रतिनिधी :

गारगोटी एस टी आगाराचा ५० वा सुवर्णमहोत्सवी वर्धापनदिन मोठ्या उत्साहात आणि विविध उपक्रमांनी साजरा करणेत आला.

आज सकाळी झालेल्या कार्यक्रमात आगारातील सर्व ६० बसेस रंगवून सजवण्यात आल्या होत्या,सर्व बस गाड्यांना पुष्पहार घालून पूजन करणेत आले, गारगोटी बार असोसिएशनचे अध्यक्ष अँड संग्रामसिंह कडव यांचे हस्ते वर्धापन दिनानिमित्त केक कापणेत आला,तर गाडीचे पूजन गारगोटी व्यापारी संघाचे अध्यक्ष विश्वनाथ घाटगे यांचे हस्ते करणेत आले. तर बस स्थानक परिसरात ग्रामपंचायत सदस्य प्रकाश वास्कर व जेष्ठ पत्रकार किशोर आबिटकर यांचे हस्ते वृक्षारोपण करणेत आले. तर आज प्रवास करण्यासाठी आलेल्या सर्व प्रवाशांना सुरेशराव सूर्यवंशी यांचे हस्ते व मान्यवरांच्या हस्ते गुलाबपुष्प देऊन त्यांच्या प्रवासासाठी शुभेच्छा देणेत आल्या.

यावेळी झालेल्या कार्यक्रमात आगार व्यवस्थापक दिलीप ठोंबरे यांनी सर्वांचे स्वागत केले. प्रा. आनंद चव्हाण यांनी आपल्या भाषणात प्रवाशांच्या सेवेसाठी हे ब्रीद घेऊन एस टीची वाटचाल चालू असून ती अनेकांची जीवनवाहिनी आहे. या एस टी मुळें अनेक विद्यार्थी शहरात जाऊन शिकले,मोठे झाले, आजही हे लोक एस टी चे ऋण मान्य करतात, याच एस टी ला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी सर्व कर्मचारी ,वाहक,चालक यांचे योगदान महत्वाचे आहे, असे सांगून त्यांनी वर्धापनदिनानिमित्त सर्व कर्मचाऱ्यांना शुभेच्छा दिल्या.

यावेळी ग्राहक पंचायतचे जिल्हा संघटक प्रशांत पुजारी, सुरेश सूर्यवंशी, व्यापारी संघाचे सचिव रमेश कारेकर, प्रमोद सोळसे, एस टीचे सेवानिवृत्त ज्येष्ठ कर्मचारी रंगराव खामकर, कार्यशाळा अधीक्षक अनिकेत चौगुले,बस स्थानक प्रमुख सौ रुपाली तोंदलें, महेश सावंत,अवधूत पाटील, शशिकांत कुंभार, प्रविण म्हाडगुत, मॅचिंद्र डोंगे, यांचेसह एस टी आगारातील सर्व चालक, वाहक,कर्मचारी उपस्थित होते.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks