ताज्या बातम्यामहाराष्ट्र

गडहिंग्लज : डॉक्टर्स कॉलनी मध्ये होणारी वाहतूक कोंडीचे नियोजन करा : शिवसेनेची मागणी

गडहिंग्लज प्रतिनिधी –

गडहिंग्लज येथिल डॉक्टर्स कॉलनी मध्ये होणारी वाहतूक कोंडीचे नियोजन करावे या मागणी साठी गडहिंग्लज शिवसेना उपशहर प्रमुख काशिनाथ गडकरी व शिवसैनिक यांनी पोलीस निरीक्षक प्रकाश गायकवाड यांच्याकडे निवेदन देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की,गडहिंग्लज शहर हे मेडिकल हब म्हणून प्रसिद्ध आहे . येथील डॉक्टर्स कॉलनी येथे अत्याधुनिक हॉस्पिटले आहेत . गडहिंग्लज , चंदगड , आजरा , भुदरगडसह कोल्हापूर जिल्ह्यातील काणाकोपऱ्यातून रूग्ण या ठिकाणी येत असतात . चौगुले बाल रूग्णालय पासून दांडेकर हॉस्पिटल ते सीटी हॉस्पिटल येथे येणारे पेशंट व अन्य कामासाठी येणारे लोक हे आपल्या सोईनुसार दुचाकी व चारचाकी वाहने पाकींग करीत आहेत . त्यामुळे ये – जा करणाऱ्या वाहनांना मोठी अडचण होऊन दररोज वाहतुकीची कोंडी होत असून याचा परिसरातील रूग्णांना तसेच पायी ये – जा करणाऱ्या नागरिकानासुद्धा त्रासदायक होत आहे . तरी आम्ही आपल्याकडे मागणी करत आहोत की , आठवड्याच्या सात दिवसांमध्ये सम – विषम पद्धतीने पार्कीगचे नियोजन करून वाहतुकीची कोंडी कमी करावी व आठवड्यातून काही दिवस टो क्रेन याठिकाणी फिरवून पाकींगचे नियम मोडणाऱ्यांची वाहने जप्त करावी.अशी मागणी गडहिंग्लज शिवसेना उपशहर प्रमुख काशिनाथ गडकरी व आदी शिवसैनिकानी निवेदनाद्वारे केली आहे.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks