पहलगाम घटनेचा मुरगुड येथे कॅन्डल मार्च ने निषेध

मुरगूड प्रतिनिधी : विजय मोरबाळे
काश्मीर मधील पहलगाम येथे झालेल्या अतिरेकी हल्ल्यामधील 28 जणांना जीव गमावा लागला.या घटनेचा निषेध करण्यासाठी मुरगूड शहरातील नागरिकांनी कॅण्डल मार्च काढून निषेध करून मृत झालेल्यांना श्रद्धांजली वाहिली. काश्मीरमध्ये झालेला हल्ला हा माणुसकीला काळीमा फासणारा आणि मास्टरमाईंड असणाऱ्या पाकिस्तानचा काळा चेहरा समोर आणणारा असा ठरला आहे.मुरगुड शहर नागरिकांनी शिवतीर्थ येथे कॅन्डल मार्च साठी जमण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार संध्याकाळी सात वाजले पासून नागरिकांनी जमण्यास सुरुवात केली होती. यानंतर कॅन्डल मार्चला सुरुवात झाली. हा कॅन्डल मार्च मुख्य बाजारपेठ – एसटी स्टँड मार्गे हुतात्मा तुकाराम या ठिकाणी या पार पडला.
यावेळी ओंकार पोतदार, संकेत भोसले , बबन बारदेसकर,दगडू शेणवी, धोंडीराम मकानदार, अनिल सिद्धेश्वर यांनी तीव्र भावना व्यक्त केल्या तसेच या हल्ल्या मागचा मास्टरमाइंड असणाऱ्या पाकिस्तानच्या निषेच्या घोषणा देण्यात आल्या. त्यावेळी तुकाराम चौकामध्ये हजारो नागरिक उपस्थित होते. यानंतर मृतांना स्तब्ध राहून श्रद्धांजली वाहण्यात आली.
या मूक मोर्चा मध्ये सर्जेराव भाट, संतोष वंडकर, संभाजी आंगज , दत्तात्रय मंडलिक , एस व्ही चौगुले, तानाजी भराडे, विलास भारमल, जयसिंग भोसले, दिलीप कांबळे, सोमनाथ यरनाळकर, मयूर सावर्डेकर, बजरंग सोनुले, जगन्नाथ पुजारी, राजू भाट, धनंजय सूर्यवंशी, प्रफुल,कांबळे, संग्राम ढेरे, राहुल शिंदे,अमर चौगुले, रणजीत मोरबाळे,संकेत शहा, राजू शहा, प्रकाश पारिशवाड , सुभाष अनावकर, जगदीश गुरव, दत्ता साळुंखे,प्रशांत सिद्धेश्वर, विक्रम गोधडे,अभी मिटके,संग्राम साळोखे यांचेसह नागरिक उपस्थित होते.