शेणगावच्या पुरग्रस्त बाधितांसाठी आयोजित केलेले शिबिर दिलासा देणारे : सरपंच सुरेशराव नाईक

गारगोटी प्रतिनिधी :
स्वर्गिय सुशिलादेवी आनंदराव आबिटकर हेल्थ फौंडेशन ने शेणगांव च्या पुरबाधीत लोकांसाठी आयोजित केलेले तपासणी व औषोधोपचार शिबिर ग्रामस्थांना दिलासा देणारे ठरले असल्याचे प्रतिपादन शेणगाव गावचे लोकनियुक्त सरपंच सुरेशराव नाईक यांनी केले.या शिबिराचा शुभारंभ सरपंच सुरेशराव नाईक यांच्या हस्ते संपन्न झाला.यावेळी उपसरपंच दिनकर कदम व कंपनी हेल्थ फँलिसिटर प्रफुल्ल पवार मुंबई हे प्रमुख उपस्थीत होते.
स्वर्गिय सुशिलादेवी आनंदराव आबिटकर हेल्थ फौंडेशन व अमेरीकेअर्स इंडिया फौंडेशन मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने आज शेणगांव ता भुदरगड येथील पुरबाधित लोकांसाठी घेतलेल्या तपासणी व औषोधोपचार शिबिराचा ७० लोकांनी लाभ घेतला.
यावेळच्या भयान महापुराने शेणगांव च्या ९४ घरात महापुराचे पाणी शिरले तर ७५ घरांना शासनाने स्थलांतराचे आदेश दिले.नदिकाठ परिसरातील बहुतांश लोकवस्ती व बाजारपेठेचा अर्धा भाग पाण्याखाली गेला.अशा लोकांना या तपासणी शिबिराची व औषोधोपचाराची फार गरज होती, अशी माहिती येथील सामाजिक कार्यकर्ते व युवा नेते उमेश तेली यांनी दिली.
डॉ गोरव महंत (कोनवडे), डॉ रणजित आबिटकर (गारगोटी) परिचारक वृषाली घरपणकर (खानापूर), फार्मासिस्ट संग्राम कांबळे, दयानंद खराडे (शेणगांव), जेष्ट कार्यकर्ते मिलिंद ताम्हणकर, अमोल कलकुटकी, समिर कांबळे, विनायक कुराडे (गारगोटी), ग्राम पंचायत सदस्य भैरवनाथ कुंभार, रविंद्र कुंभार, विनायक गुरव, सागर खैरे, सुरेश खैरे, संतोष घोडके, योगेश कोळी, शिवप्रसाद तेली आदि उपस्थीत होते.
आशा स्वयंसेविका विश्रांती सणगर, सविता खटावकर यांनी या उपचार शिबिरास आपले योगदान दिले. अशा प्रकारे हे तपासणी व औषोधोपचार शिबिर निटनेटक्या नियोजनाप्रमाणे पार पडले.