ईनाम सावर्डे येथील प्रतिष्ठित नागरिक वै. ह.भ.प.भैरू गावडे-पाटील

चंदगड प्रतिनिधी : पुंडलिक सुतार
ईनाम सावर्डे येथील वारकरी संप्रदायातील ज्येष्ठ व्यक्तिमत्त्व व प्रतिष्ठित नागरिक वै. ह.भ.प.भैरू कृष्णा गावडे-पाटील.
वय 78 वर्ष यांचे मंगळवार दि.24 ऑक्टोबर 2023 रोजी दुपारी 2 वाजून 40 मिनिटांनी आकस्मिक निधन झाले.त्यांचा अल्प परिचय थोडक्यात, वै. ह.भ.प.भैरू गावडे-पाटील यांचे शिक्षण जुनी पहिली पर्यंत झाले होते.
त्यांचा स्वभाव साधा,मनमिळावू ,प्रेमळ प्रसंगी रागीट व व्यावहारिक वृत्तीचा असा होता. लहानांपासून थोरांपर्यंत सर्वजण त्यांना बुवा म्हणून बोलवत असत सुरवातीला ते ठाणे जिल्ह्यातील मिल मध्ये नोकरीस होते मात्र मिल बंद पडली व ते गावी येऊन स्थायिक झाले.ते सुशिक्षित असलेने गावगाडा कसा चालवायचा याचा त्यांना अभ्यास होता त्यामुळे गावात त्यांनी मूलभूत सुविधा उपलब्ध करून घेतल्या व गावकऱ्यांच्या सहकार्याने त्यांनी गावप्रमुख पदाची धुरा सांभाळली. वर्षभरापासून ते शिरगाव ईनाम सावर्डे ग्रामपंचायतीला सदस्य पदावर कार्यरत होते.
गावातील ते पहिलेच वारकरी बनले होते.पंढरपूर ला त्यांनी आतापर्यंत 53 कार्तिकी वारी केल्या होत्या.पंढरीच्या पांडुरंगा चे ते निस्सीम भक्त होते.त्यांच्या अचानक जाण्याने पंचक्रोशीत शोककळा पसरली आहे.त्यांच्या पश्चात पत्नी ह.भ.प.श्रीमती सुभद्रा,मुलगा ह.भ.प. जोतिबा उर्फ पिंटू,सून सौ.माया,नातवंडे वैदही, शुभांगी,स्वरा,अनवी,कार्तिकी मुली सौ.अलका अशोक गावडे(नांदवडे),श्रीमती भावना विनायक राऊळ(सावंतवाडी),सौ.मीना संदीप पाटील(गुडेवाडी),भाऊ बाळू गावडे,भावजय सौ.गुणवंता बाळू पाटील, पुतणे-विनोद,ज्ञानेश्वर असा परिवार आहे.दिवसकार्य शुक्रवार दि.03 नोव्हेंबर 2023 रोजी आहे.
ऋणनिर्देश-
आमचे वडील वै.ह.भ.प.श्री.भैरू कृष्णा गावडे-पाटील यांचे आकस्मिक निधन झाले.तालुक्यातील नेतेमंडळी, सामाजिक कार्यकर्ते, सर्व समाज बांधव,भगिनी,नातेवाईक, पाहुणे मंडळी,मित्रपरिवार,सरपंच, उपसरपंच, सर्व सदस्य ,हितचिंतक व ग्रामस्थांनी आमच्या दुःखात सामील होत आमच्या परिवाराचे सांत्वन करीत धीर दिला याबद्दल गावडे-पाटील परिवार आपल्या सर्वांचे ऋणी आहे.