कै. शंकर धोंडी पाटील यांच्या आदर्श विचारांची जोपासना करा : प्रा जयंत आसगावकर

तरसंबळे प्रतिनिधी : शाम चौगले
दीन दलित, धरणग्रस्तांचे कैवारी लोकनेते कै.आम. शंकर धोंडी पाटील यांचे विचार प्रबोधन घडवून आणणारे आहेत. त्यांच्या आचार विचारांची जोपासना करणे ही त्यांना आदरांजली ठरेल असे प्रतिपादन शिक्षक आमदार जयंत आसगावकर यांनी केले.
कंथेवाडी (ता.राधानगरी) येथे राधानगरी-भुदरगडचे जनता दलाचे दिवंगत आमदार लोकनेते शंकर धोंडी पाटील यांच्या २३ व्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी जनता दलाचे महाराष्ट्र राज्य सचिव शिवाजीराव परुळेकर होते.सभापती सोनाली पाटील प्रमुख उपस्थित होत्या.
प्रारंभी कै शंकर धोंडी पाटील माध्यमिक विद्यालयाच्या प्रांगणातील शंकर धोंडी पाटील यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे पुजन व पुष्पहार अर्पण आमदार आसगावकर व गोकुळ चे संचालक अभिजित तायशेटे,बिद्रीचे उपाध्यक्ष विठ्ठलराव खोराटे यांच्या हस्ते करण्यात आले.लोकमान्य टिळक व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजनही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
स्वागत विद्यालयाचे अध्यापक एस एस पाटील यांनी तर प्रास्ताविकात संस्थापक,जनता दलाचे नेते व भोगावतीची माजी संचालक वसंतराव पाटील यांनी शंकर धोंडी पाटील यांच्या कार्याचा आढावा घेतला.यावेळी जि.प.सदस्य पांडुरंग भांदिगरे, शिवाजीराव परुळेकर,प्रदीप पाटील यांनी मनोगते व्यक्त केली.
कार्यक्रमासाठी सरपंच जयश्री पाटील,उपसरपंच अरुणा भोपळे,माजी सभापती दिपाली पाटील,दिलीप कांबळे,माजी उपसभापती मोहन पाटील,शिवाजीराव पाटील,विठ्ठल मुसळे,शरद पाडळकर,व्ही बी सरावणे श्रीकांत साळुंखे दीपक पाटील, मुख्याध्यापक बि.जी. पाटील, बी. आर. कुणकेकर, सी. बी.मोरे, एस.आय.मणेर, के डी पाटील, बी एम बी एम वडार, श्याम चौगले आदीसह,आदींसह विविध सेवा संस्थांचे पदाधिकारी व ग्रामपंचायत सदस्य नागरिक उपस्थित होते.सूत्रसंचालन टी एल किल्लेदार यांनी केले.तर आभार संस्था सचिव अभिजित पाटील यांनी मानले.