ताज्या बातम्यामहाराष्ट्र
कै. हिराबाई रामचंद्र पाटील यांच्या स्मृतिप्रित्यर्थ सामाजिक बांधिलकी जपत कसबा वाळवे येथील मूकबधिर विद्यालयास मदत

मुरगुड प्रतिनिधी : विजय मोरबाळे
कोनवडे ता.भुदरगड येथील शिक्षक आणि कोल्हापूर जिल्हा माध्यमिक शिक्षक बँकेचे मा.चेअरमन प्रा.हिंदुराव पाटील यांनी आपल्या आईच्या प्रथम स्मृतीदिनानिमित्य वाळवे ता.राधानगरी येथील मूकबधिर शाळेस भरीव अशी आर्थिक मदत केली.नेहमीच उपक्रमशील आणि समाजात असणाऱ्या दुर्बल घटकांना नेहमी मदत करणारे सर अशी त्यांची ओळख अजून ठळक बनली.
वाळवे येथील मूकबधिर शाळेचे व्यवस्थापक सुशांत पाटील यांच्याकडे महापुरामुळे झालेल्या पडझडीसाठी नवीन इमारत बांधणेकरिता रोख पाच हजार रुपये सुपूर्द केले.
यावेळी प्रा .एस . बी . पाटील, ,यशवंत लोकरे, अजिंक्य पाटील ,संकेत पाटील, शिवाजी पाटील, प्रथमेश वैराट, अभि कामत, दिगंबर पाटील, वैभव पाटील श्री . दत्तात्रय निळपणकर सर (कसबा वाळवे ) आदी उपस्थित होते .