शेतीकामासाठी म्हैशींचा आधार; इंधन व बैलजोडीच्या किंमती वाढल्याचा परिणाम

कुडूत्री प्रतिनिधी : सुभाष चौगले
तेलांच्या वाढत्या किंमती आणि बैल जोडीची लाखाच्यापार गेलीली किंमत या मुळे शेतकरी वर्गाला आर्थिक बुर्दंड तर सोसावा लागतो आहेच.अशावेळी भात रोप लागणीसाठी शेतकऱ्यांना घरच्या म्हैस यांचा आधार घ्यावा लागत आहे.व ग्रामीण भागात रोप लागण काम साधले जात आहे.
दिवसेंदिवस बाजार पेठेत वाहनांसाठी लागणाऱ्या इंधनाच्या किमतीत भरमसाठ वाढ झाली आहे.आधिच कोणतेही काम अगर कोरोना प्राश्वभूमीवर आर्थिक चणचण भासत असताना शेती कामासाठी वाहनांसाठी इंधन खरेदी करणे अवघड जात आहे. आज पेट्रोलचा दर १०६ रुपये पर्यंत तर डिझेल ९६ रुपयाच्या आसपास इतका दर आहे. इंधनावर चालणाऱ्या रोटावेटर यांचे चिखल करण्याचे दर प्रति गुंटा १५० रुपये ते १७० रुपये आसपास आहेत.तर एक दिवसासाठी शेतातील औताचा दर ही एक हजार च्या वर आहे.अशा वेळी हे दर शेतकऱ्यांना देणे अवघड जात आहेत.
सद्य काळात महागाई पाहता शेतकऱ्यांना या महागाई जमान्यात इंधन आणि रोटावेटर आणि बैलांचे औत न परवडण्यासारखे असल्याने शेतकरी वर्गाची आर्थिक ओढाताण होत आहे.अशावेळी भात रोप लागणीसाठी घरातील म्हैस यांचा उपयोग होतांना दिसत आहे. म्हैस आता शेतकऱ्यांना दुध आणि शेती कामे अशा दुहेरी फायदयासाठी उपयुक्त ठरत असून त्यांची खाण्यापिण्याकडून योग्य ती दखल घेतली जात असून त्यांचेही आरोग्य शेतकऱ्यांकडून जपले जात आहे.
एकंदरीत शेतकरी आर्थिक संकटात असतांना म्हैस शेतकरी वर्गाला आधारवड बनत असल्याचे चित्र शिवारात दिसत आहे.