ताज्या बातम्यामहाराष्ट्रराजकीय

BREAKING NEWS :भाजपचे तेरा आमदार व काही नेते पक्ष सोडणार : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा मोठा गौप्यस्फोट.

शरद पवार यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत हा दावा केला.

लखनौ :

उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणुकीच्या (Assembly Election) तारखा जाहीर झाल्यानंतर भाजपला जोरदार धक्के बसण्यास सुरूवात झाली आहे. एकाच दिवशी एका मंत्र्यासह चार आमदारांनी पक्षाला रामराम ठोकला आहे. पण पुढील काही दिवसांत दररोज भाजपमधील नेते पक्ष सोडतील. भाजपचे तेरा आमदार व काही नेते पक्ष सोडणार असल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी केला आहे.

शरद पवार यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत हा दावा केला. उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) मध्ये समाजवादी पक्षा (SP) सोबत राष्ट्रवादी निवडणूक लढवणार असल्याचेही पवार यांनी यावेळी जाहीर केलं. तसेच गोवा (Goa) व मणिपूरमध्येही राष्ट्रवादी उमेदवार उतरवणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केलं. उत्तर प्रदेशातील ओबीसींचे मातब्बर नेते म्हणून ओळख असलेल्या स्वामी प्रसाद मौर्य यांच्या राजीनाम्यानंतर तासाभरातच तीन आमदारांनीही राजीनामा दिल्याने भाजपमध्ये मंगळवारी खळबळ उडाली.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks