ताज्या बातम्यामहाराष्ट्र
ब्रेकिंग न्यूज : नवाब मलिक यांना ईडीकडून अटक , मालमत्ता व्यवहारप्रकरणी कारवाई

निकाल न्यूज ऑनलाईन :
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांना अंमलबजावणी संचालनालयाकडून (ईडी) आज (ता. 23) अटक करण्यात आली. जुन्या मालमत्तांच्या व्यवहारप्रकरणी ही कारवाई करण्यात आल्याचे समजते.
इक्बाल कासकर याने चौकशीत नाव घेतल्यानंतर मलिक यांच्या घरी आज सकाळीच ईडीचे पथक धडकले होते. त्यानंतर मलिक यांना चौकशीसाठी ईडी कार्यालयात नेण्यात आले. सकाळपासून त्यांची चौकशी सुरु होती. अखेर त्यांना अटक करण्यात आली.
गुन्हेगारांकडून जमीन खरेदीचा ठपका
मलिक यांना आता मेडीकलसाठी जेजे रुग्णालयात नेण्यात आलं आहे. मेडिकल तपासणी झाल्यावर त्यांना न्यायालयासमोर हजर केले जाणार आहे.. गुन्हेगारांकडून जमीन खरेदी केल्याचा ठपका नवाब मलिक यांच्यावर ठेवला असून, त्या प्रकरणी ही कारवाई करण्यात आली.