मा.आम.के.पी.पाटील यांचे मुदाळ घरी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सूळे यांची सदिच्छा भेट ; सहकार व शैक्षणिक जडणघडण आदर्शवत असल्याचे व्यक्त केले मत

मुदाळतिट्टा प्रतिनिधी :
मुदाळ ता.भुदरगड येथील मा.आमदार के.पी. पाटील यांचे घरी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया ताई सुळे यांनी सदिच्छा भेट दिली.यावेळी के.पी.पाटील यांचे बरोबर राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रेवर चर्चा झाली.
याबरोबर बिद्री साखर कारखान्याच्या प्रगती व उच्चांकी उसदराची तसेच राज्यभर चर्चेत राहीलेल्या हूतात्मा स्वामी वारके सुतगिरणीचा अव्वल कारभार तसेच इथं उभा केलेल्या शिक्षण संकूलाचा मेरीट फॉम्यूला त्यांनी जाणून घेतला. यावेळी सहकार व शैक्षणिक क्षेत्रातील जडणघडण प्रशंसनीय असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. चर्चेत विकासराव पाटील व गोकूळ व जिल्हा बॅक संचालक रणजितसिंह पाटील होते.
यावेळी खास.सुप्रियाताई सूळे यांचा सत्कार शिवाजी विद्यापीठ मा.सिनेट सदस्या सौ मायादेवी पाटील , सखी मंचच्या अध्यक्षा सौ.राजनंदीनी पाटील,वसूंधरादेवी पाटील यांचे हस्ते झाला प्रसंगी राष्ट्रवादीचे तालूकाध्यक्ष विश्वनाथ कुंभार व सेलचे पदाधिकारी उपास्थित होते.