ताज्या बातम्याभारतमहाराष्ट्र
BREAKING : कोल्हापूरमधील रेल्वे स्टेशनवरील रेल्वेला आग; एक डबा जळून खाक

कोल्हापूर :
कोल्हापूर येथील रेल्वे स्टेशनवरील सर्व्हिसिंग वर्कशॉप येथे रेल्वेच्या एका डब्याला भीषण आग लागली होती. काल रात्रीच्या सुमारास ही आग लागली. अग्निशमनचे तीन बंब तसेच, जीवन रक्षक आपात्कालीन सेवा संस्थेचे जवान आदींच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले आहे. आगीमध्ये रेल्वेचा एक डबा जळून खाक झाला आहे.