ताज्या बातम्या
बोरवडेसह परीसरात पोलिसांचे संचलन

बिद्री प्रतिनिधी अक्षय घोडके
अनंत चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था तसेच शिस्तीचे पालन होण्याच्या पार्श्वभूमीवर, गणेशोत्सव शांततेत पार पडावा, यासाठी पोलिसांनी बोरवडेसह परिसरातील संवेदनशील गावातून संचलन केले. मुरगूड पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक विकास बडवे यांच्या मार्गदर्शनाखाली मुरगुड पोलिस ठाण्याच्या हद्दीतील प्रमुख गावात पोलिसांनी संचलन केले.

बोरवडे , मुरगुड सावर्डे व सेनापती कापशी आदी गावातून पोलिसांनी संचलन केले. सहाय्यक पोलिस निरीक्षक विकास बडवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक कुमार ढेरे वाघमारे, बोरवडे बिटचे प्रशांत गोजारी , मोरे बोरवडेचे पोलीस पाटील आदी सह ४० ते ५० पोलिस कर्मचाऱ्यां व होमगार्ड तसेच या पोलीस संचलनात चार सायरनच्या पोलिस गाडया’सहभागी झाल्या होत्या.