#BLOOD_CAMP : गिरिजा फाउंडेशन आयोजित रक्तदान शिबिरला उस्फुर्त प्रतिसाद

कूर :
कोनवडे(ता.भुदरगड) येथे गिरिजा फाउंडेशन यांच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरला उस्फुर्त प्रतिसाद लाभला. रक्तदान शिबिर मध्ये तीस रक्तदात्यांनी रक्तदान केले असल्याची माहिती गिरिजा फाउंडेशनचे अध्यक्ष युवराज पाटील (भावड्या) यांनी दिली.
यावेळी प्रमुख उपस्थितीमध्ये भाजपचे नेते देवराज बारदेस्कर, मनसेचे नेते युवराज येडूरे, धनाजी मोरस्कर सर, भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष पार्थ सावंत, संवाद संस्थेचे रविदादा देसाई, स्वराज कामगार संघटनेचे जिल्हाध्यक्ष रामभाऊ पाटील, युवा नेते पंढरीनाथ पाटील, कोनवडेचे उपसरपंच सुभाष पाटील, प्राध्यापक एच. आर. पाटील, राहुल पाटील, यशवंत पाटील, प्रशांत पाटील, भाऊसो कळमकर, नवनाथ पाटील, प्रवीण पाटील, अभिजीत पाटील, वैभव पाटील, दिगंबर पाटील, राजू पाटील, गौरव खतकर, पत्रकार राम देसाई, विलास पाटील, मेजर उत्तम पाटील, मेजर बाळासो चौगुले, मेजर अमोल पाटील, नवनाथ पाटील, दीपक लोकरे व भावड्या प्रेमी उपस्थित होते.