ब्रम्हाकुमारी विश्वविद्यालयाने दिल्या सजीव देखाव्यातून दीपावलीच्या शुभेच्छा

प्रतिनिधी : विजय मोरबाळे
दीपावली म्हणजे आनंदाचा सण.प्रकाश दीपांनी उजळून निघणारा आणि आतषबाजीच्या आवाजाने दुमदुमुन जाणारा सण. ब्रम्हाकुमारी विश्वविद्यायाने मात्र अगदी वेगळ्या प्रकारे दीपावलीच्या शुभेच्छा साधकांना दिल्या आहेत. लक्ष्मी नारायणा सह सजीव स्वर्गीय देखावा आणि साधकांच्या मार्फत शेकडो ज्योती प्रज्वलित करून विद्यालयाने भावभक्तीचा सुंदर संदेश दिला.
जिल्ह्यात अनेक केंद्रात असा सोहळा आयोजित केल्याचे लता बहेंनजी यांनी सांगितले.त्यांनी स्वतः सर्व साधकांना साधनेचे प्रात्यक्षिक दिले. ‘कलियुगका अंधेरा मिट जायेगा ‘ या शिर्षगिताने संगीतमय वातावरणात देखावा सादर करण्यात आला.
एकेक करत मातीच्या पणत्या पेटत होत्या आणि त्याच वेळी हृदयात ‘ओम् शांती’ च्या मंद ज्योती प्रज्वलित होत होत्या.देखावे पहाण्यासाठी महिला पुरुष अबालवृद्धांनी गर्दी केली होती.प्रेम,दया क्षमा आणि शांती सह सामर्थ्य सुध्दा वाढवले पाहिजे असा सुंदर संदेश देण्यात आला. “गणेशोत्सवातील अप्रतिम देखावें पाहून मन भरले नाही ते आता इथे भरले “असे उद्गार कांहीं भक्तांनी काढले.
हे देखावे सजविण्या मध्ये अनिल अंगज,राजू कांबळे,भिकाजी भांदिगारे,राम पाटील,लता बहेंनजी,लक्ष्मी बहेंनजी,तुकाराम भामरे व अन्य ब्रम्हा कुमार ,ब्रम्हा कुमारी यांनी मोलाचे योगदान दिले.सर्व मंदिरांच्या पुजाऱ्यांना बोलावून त्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून त्यांचा सन्मान करण्यात आला.
सजीव देखाव्यात सहभागी झालेले बाल कलाकार याप्रमाणे.
सयुरी सागर नादवडे,आराध्या सागर नादवडे,विराज योगेश वंडकर,विराज युवराज भाकरे,देवयानी प्रदीप रंडे, आराध्या अनिल अंगज,सृष्टी अनिल अंगज, यज्ञा योगेश वंडकर, आराध्या युवराज भाकरे ,जयश्री युवराज भाकरे ,अधिरा आकाश कदम,पूजा पुंडलिक कोळेकर ,जोधा मगदूम.असे देखावे रविवार पर्यंत प्रेक्षकांसाठी उपलब्ध रहाणार आहेत.