ताज्या बातम्या
बिद्री येथिल समाजरत्न श्री.सुरेश तामोत यांची राष्ट्रीय महामंत्री पदावर निवड

बिद्री प्रतिनिधी अक्षय घोडके
राष्ट्रीय अध्यक्ष मा.मुकेश सारवान यांच्या खंबीर नेतृत्वांतील उपेक्षित दलित सामाजिक परिषदेच्या राष्ट्रीय महामंत्री पदावर समाजरत्न सुरेश तामोत यांची निवड झाली आहे.
महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात,
मध्य प्रदेश, राजस्थान, हरियाणा, दिल्ली या राज्यात संघटनेच्या विस्तारासह
वाल्मिकी, मेहतर,मखियार,रूखी, सुदर्शन, मुस्लिम – मेहतर या समाजाच्या शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक सर्वांगीण विकासाकरिता सुरेश तामोत यांचे अतुलनीय असे कार्य आहे.
राष्ट्रीय महामंत्री या पदावर त्यांच्या नियुक्तीमुळे समाजामध्ये आनंदाचे वातावरण असून त्यांचेवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.