मोठी बातमी : सोनाळी येथील आरोपीला पाच दिवसांची पोलीस कोठडी; कागल येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारींचा निर्णय.

कागल :
विजया काटकर, प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी, कागल यांनी आरोपीला 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. जमावामुळे तपास कामात अडथळा येत असल्याचे पोलिसांनी सांगितले.
तत्पूर्वी, सोनाळी (ता. कागल) येथील अपहृत झालेल्या वरद रवींद्र पाटील या सात वर्षाच्या बालकाचा सावर्डे बु येथे खून झालेचे निष्पन्न झाले.हा तपास अतिजलद गतीने व्हावा ‘हा खटला फास्टॅग कोर्टात चालवा, खूनी नराधमाला फाशीची शिक्षा व्हावी, या मागणीसाठी आज (शनिवार) मुरगूड पोलीस ठाण्यावर सोनाळी व सावर्डे ग्रामस्थांचा मोर्चा काढण्यात आला. नराधमाला फाशीची शिक्षा दया, निष्पाप वरदला न्याय दया, अशा घोषणा देत सोनाळी व सावर्डे ग्रामस्थांचा मोर्चा मुरगूड बाजारपेठेतून पोलीस ठाण्यासमोर गेला. या ठिकाणी ग्रामस्थांनी ठिय्या मांडला. या मोर्चात महिलांची संख्या लक्षणीय हाेती. वरदचे आजोबा शंकर पाटील व अन्य नातेवाईकही या मोर्चात सहभागी झाले होते.

पोलीस ठाण्यासमोर दोन्ही गावांतील हजारो ग्रामस्थ भर उन्हात घोषणा देत होते. दोन तास महिलांनी ठिय्या आंदोलन केले. यावेळी मुरगूड पोलीस ठाण्याचे अधिकारी विकास बडवे व किशोर खाडे ग्रामस्थांना समजून सांगण्याचा प्रयत्न करीत होते; पण संतप्त ग्रामस्थ महिला व पुरुष ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते.
या वेळी अप्पर पोलीस अधिक्षक तिरुपती काकडे व पोलीस उपअधीक्षक आर आर पाटील येथे आले. या घटनेचा योग्य तपास होईल, असे त्यांनी सांगितले.संतप्त ग्रामस्थ आणि पदाधिकार्यांनी पोलिस ठाण्यासमोर ठाण मांडून होते. त्यामूळे जादा पोलीस कुमक मागवण्यात आली होती.