ताज्या बातम्यामहाराष्ट्र
मनसे कागल तालुकाध्यक्ष सौरभ पोवार यांच्या वाढदिवसानिमित्त महाआरोग्य शिबीर

मुरगुड प्रतिनिधी : विजय मोरबाळे
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कागल तालुकाध्यक्ष सौरभ पोवार यांच्या वाढदिवसानिमित्त शिवतेज फाउंडेशन व आथायु हॉस्पिटल कोल्हापूर यांच्या सहयोगाने यमगे येथे महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
या महाआरोग्य शिबिराचा 117 रुग्णांनी मोफत लाभ घेतला. या शिबिरास नागरिकांनी उस्फुर्त सहभाग नोंदवला. या कार्यक्रमाचे उद्घाटन प्रसंगी शिवाजी पोवार ,मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष रोहन निर्मल , राधानगरी तालुक्याचे गटनेते युवराज येडुरे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
यावेळी शिवतेज विभुते,राहुल पाटील,शरद किल्लेदार,प्रकाश देसाई,शुभम कुंभार,सुदेश पेडणेकर यांचेसह आथायु हॉस्पिटलचा नर्सिंग स्टाफ, गावातील नागरिक उपस्थित होते.