ताज्या बातम्यामहाराष्ट्र

Big Breaking : राज्य सरकारचा मोठा निर्णय

मुंबई प्रतिनिधी :

राज्यातील कोरना रूग्णांची संख्या मागील काही दिवसांपासून सातत्याने कमी होत आहे. त्यामुळे राज्य राज्य सरकारने अनेक कोराना प्रतिबंधात्मक नियमांमध्यये शिथिलत दिली आहे. दरम्यान, ज्या नागरिकांचे संपू्र्ण लसीकरण झालेले आहे अशाच व्यक्तींना यापुढे सार्वजनिक वाहतुकीने प्रवास करता येणार आहे. राज्य सरकारने जारी केलेल्या नव्या नियमावलीत हा आदेश देण्यात आला आहे.

नव्या नियमावलीनुसार, राजकीय सभांना, जाहीर कार्यक्रमांना परवानगी देण्यात आली आहे. मात्र नियम पाळले जात नसतील तर संबंधित आयोजकांवर 50 हजार दंड आकारण्याबरोबर कार्यक्रम बंद करण्याचा अधिकार स्थानिक प्रशासनाला देण्यात आला आहे.

राज्य सरकारने नव्याने जाहीर केलेले नियम

लसीकरण पूर्ण झालेल्यांनाच आता सार्वजनिक वाहतुकीने प्रवास करता येणार आहे. राज्य सरकारने जारी केली नवी नियमावली जाहीर केली आहे.

मुंबईतील लोकलप्रमाणे एसटी, बससेवा, टॅक्सी, रिक्षाने प्रवास करायचा असेल तर दोन डोस घेतलेल्यांनाच परवानगी देण्यात आली आहे.

कोरोनाचे नियम न पाळणार्‍यांविरुद्ध दंडाची व्याप्ती वाढवण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे.

रिक्षा, टॅक्सीत बसलेल्या प्रवाशाने मास्क वापरला नसेल तर प्रवाशाला 500 रुपये आणि रिक्षा-टॅक्सी चालकालाही 500 रुपये दंड आकारला जाणार आहे.

दुकानात ग्राहकांने मास्क घातला नसेल तर ग्राहकाला 500, तर संबंधित दुकानदाराला 10 हजार रुपये दंड आकारला जाणार आहे.

मॉल्समध्ये ग्राहकांने मास्क घातला नसेल तर मॉल्स मालकाला 50 हजार रुपये दंड आकारला जाणार आहे.

राजकीय सभांना, जाहीर कार्यक्रमांना परवानगी, मात्र नियम पाळले जात नसतील तर आयोजकांवर 50 हजार दंड आकारण्याबरोबर कार्यक्रम बंद करण्याचा अधिकार स्थानिक प्रशासनाला देण्यात आले आहेत.

वानखेडे स्टेडियममध्ये होणाऱ्या 3 ते 7 डिसेंबरदरम्यान होणार्‍या भारत-न्यूझीलंड कसोटी सामन्याच्या पार्श्वभूमीवर स्टेडियम आणि खुल्या मैदानात 25 टक्के प्रेक्षकांना उपस्थितीस परवानगी देण्यात आली आहे.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks