ताज्या बातम्या

ऑक्सिजन जनरेटर प्रकल्प ठिकाणी जनरेटर बसवावेत : जिल्हाधिकारी दौलत देसाई

कोल्हापूर : रोहन भिऊंगडे

नियोजित सात ठिकाणी पीएसए ऑक्सिजन जनरेटरचे काम लवकर पूर्ण करून त्याठिकाणी विद्युत जनरेटर बसवावा. त्याचबरोबर जिल्ह्यातील कोव्हिड काळजी केंद्र, कोव्हिड आरोग्य केंद्र या ठिकाणीही जनरेटर बसवावा, असे निर्देश जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील राजर्षी छत्रपती शाहू सभागृहात पीएसए ऑक्सिजन जनरेशन प्रकल्प उभारणी करण्याबाबत आज बैठक घेण्यात आली. जिल्हाधिकारी श्री. देसाई यांनी याबाबत सविस्तर आढावा घेतला. ते म्हणाले, महावितरणने प्रकल्पासाठी स्वतंत्र जोडणी देण्याबाबत ट्रान्सफॉर्मर द्यावा. लवकरात- लवकर काम सुरू करावे. विद्युत पुरवठा कायम सुरू ठेवण्याच्या दृष्टिकोनातून त्या ठिकाणी विद्युत जनरेटर बसवावेत. उपजिल्हा रूग्णालय गडहिंग्लज याठिकाणी तात्काळ जनरेटर बसवावा. त्याला ॲटो स्विच असावा, असेही ते म्हणाले.जिल्ह्यतील सर्व कोव्हिड काळजी केंद्र, कोव्हिड आरोग्य केंद्राच्या ठिकाणीही जनरेटर बसवण्यात यावा. त्याठिकाणचा वीज पुरवठा, तेथील सुरक्षा याबाबतही महावितरणने पाहणी करावी.

यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, अपर जिल्हाधिकारी किशोर पवार, निवासी उपजिल्हाधिकारी भाऊ गलंडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संभाजी माने, यांत्रिकी विभागाचे अधीक्षक अभियंता सी.ए. गायकवाड, महावितरणचे अधीक्षक अभियंता अंकुर कावळे, पाटबंधारे अधीक्षक अभियंता महेश सुर्वे, जिल्हा आरोगय अधिकारी डॉ. योगेश साळे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनिल माळी, तहसलिदार अर्चना कापसे, रंजना बीचकर उपस्थित होते.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks