बिद्री व्यापारी असोसिएशन तर्फे शाहू जयंती उत्साहात..

बिद्री प्रतिनिधी : अक्षय घोडके
येथे बिद्री व्यापारी असोसिएशन तर्फे शाहू जयंती उत्साहात पार पाडली त्यावेळी बिद्री व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष सुधीर कांबळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले ते म्हणाले.
शाहू महाराजांचा जन्म जून 26, इ.स. 1874 रोजी कागल येथील घाटगे घराण्यात झाला. त्यांचे नाव यशवंत, त्यांच्या वडिलांचे जयसिंगराव (आप्पासाहेब), आईचे नाव राधाबाई होते. कोल्हापूर संस्थानाचे राजे चौथे शिवाजी महाराज यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्नी आनंदीबाई यांनी 17 मार्च, इ.स. 1884 रोजी यशवंतरावांना दत्तक घेतले, व शाहू हे नाव ठेवले. एप्रिल 2, इ.स. 1894 रोजी त्यांचा राज्यारोहण समारंभ झाला. राज्याभिषेक झाल्यानंतर इ.स. 1922 सालापर्यंत म्हणजे 28 वर्षे ते कोल्हापूर संस्थानाचे राजे होते. मुंबई येथे मे 6, इ.स. 1922 रोजी त्यांचे निधन झाले.
शाहू महाराजांचा 26 जून हा जन्म दिवस सामाजिक न्याय दिवस म्हणून पाळला जातो. त्यादिवशी कोल्हापूरमध्ये आणि अन्यत्र काही ठिकाणी बरेच सार्वजनिक कार्यक्रम होतात. त्याच पद्धतीने यापुढे बिद्री व्यापारी असोसिएशन तर्फे सार्वजनिक कार्यक्रमांचे आयोजन करणेत येईल.
त्यावेळी बिद्री व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष , उपाध्यक्ष , सर्व संचालक मंडळ , मा.पंचायत समिती सदस्य नंदू पाटील , बाळासाहेब फराकटे , आनंदा वरुटे , शांताराम तौंदकर , डॉ.तानाजी हरेल , संजय खाडे , उदय खराडे , अजित घोरपडे , सुरेश कुंभार ,सतीश माने , सागर सूर्यवंशी, धनाजी साठे , नामदेव खामकर , डॉ.अमित शिंदे , अक्षय पोवार , संजय बिल्ले , इतर व्यापारी व ग्रामस्त उपस्थित होते.