बिद्री गावच्या विकासाला नेहमीच सहकार्य राहील : माजी खास. संजय मंडलिक
बिद्रीत वॉटर एटीएमचे उदघाटन, मटण मार्केटचा पाया खुदाई समारंभ संपन्न

बिद्री प्रतिनिधी अक्षय घोडके :
बिद्री गावच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक ती मदत करण्यासाठी आपण नेहमीच तत्पर आहे. ग्रामपंचायतीने वॉटर एटीएम उभारुन ग्रामस्थांना पिण्याच्या स्वच्छ पाण्याची सोय केली आहे. यामुळे आरोग्याचा प्रश्न सुटण्यास मदत होणार असून भविष्यातही अशा चांगल्या योजना ग्रामपंचायतीने राबवाव्यात. यापुढील काळातही बिद्री गावच्या विकासाला आपले नेहमीच सहकार्य राहील, असे प्रतिपादन माजी खास. संजय मंडलिक यांनी केले. बिद्री ( ता. कागल ) येथील ग्रामपंचायतीने स्वनिधीतून पाच लाख रुपये खर्चून उभारलेल्या वॉटर एटीएमचे उदघाटन आणि २५ लाख रुपयांच्या नवीन मटण मार्केटचा पाया खुदाई समारंभ माजी खास. संजय मंडलिक यांच्या हस्ते पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हमिदवाडा सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष आनंदराव फराकटे होते.
यावेळी हमिदवाडाचे संचालक विरेंद्र मंडलिक, माजी जि. प. सदस्य भूषण पाटील, पांडूरंगतात्या पाटील, पांडूरंग संतराम पाटील, माजी पं. स. सदस्य नंदकुमार पाटील, जयदिप पोवार, बालाजी फराकटे, सरपंच पूजा पाटील, उपसरपंच सागर कांबळे, आण्णासो पोवार, पांडूरंग चौगले, शहाजी गायकवाड, पांडूरंग कळमकर, दिगंबर पाटील, डॉ. आप्पासो पाटील, शहाजी पाटील, विजय वर्णे यांच्यासह सर्व ग्रा .पं. सदस्य, विविध संस्थांचे पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.
स्वागत शहाजी गायकवाड यांनी केले. प्रास्ताविक शहाजी पोवार यांनी केले. तर आभार राजेंद्र चौगले यांनी मानले.