ताज्या बातम्यामहाराष्ट्र

बिद्री साखर कारखाना आगामी काळातही ऊस दरात आघाडीवर असेल : के. पी. पाटील ; ६५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत

बिद्री प्रतिनिधी :

कारखान्याची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून सत्तेची स्वप्ने पाहणारी काही मंडळी विनाकारण चांगल्या संस्थेची बदनामी करत आहेत. परंतू संचालक मंडळाने पारदर्शी कारभारातून आर्थिक ताळेबंद भक्कम केला आहे. कायम ऊस दरात आघाडीवर असणारा हा कारखाना आगामी हंगामातही दरात मागे रहाणार नाही. असे प्रतिपादन अध्यक्ष के. पी. पाटील यांनी केले.
 

येथील श्री. दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखान्याच्या ६५ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते अध्यक्षपदावरुन बोलत होते. कारखान्याची सभा खेळीमेळीत  व शांततेत पार पडली. यावेळी विषय पत्रीकेवरील सर्व विषयांना सभासदांनी टाळ्यांच्या गजरात मंजूरी दिली.
 

अध्यक्ष श्री. पाटील म्हणाले, कारखान्याचे विस्तारीकरण झाले आहे. त्यामुळी आगामी हंगामात प्रतिदिनी ८००० मे. टन ऊस गाळप होणार आहे. त्यामुळे महिन्याला अडीच लाख टन ऊस गाळप होईल. त्यामुळे १५ मार्च नंतर कारखाना कार्यक्षेत्रात ऊस शिल्लक राहणार नाही. सभासदांनी घाई न करता सर्व ऊस बिद्री कारखान्याला गळीतासाठी पाठवून सहकार्य करावे. कारखान्याने सहवीज प्रकल्प काढून एक उत्पन्नाचा नवा स्त्रोत निर्माण केला आहे. सहवीज प्रकल्पाचे उत्पन्न नफा – तोटा पत्रकास घेवून ऊस उत्पादकांना जास्तीत जास्त दर देण्याचा प्रयत्न केला आहे. या प्रकल्पाप्रमाणेच इथेनाँल निर्मिती प्रकल्प येत्या वर्षभरात पुर्ण होणार असून या प्रकल्पामुळे कारखाना कार्यक्षेत्रातील सभासदांचे सोने झाल्याशिवाय राहणार नाही.
 

यावेळी सभासदांच्या वतिने कारखान्याच्या सहवीज प्रकल्पास देशात प्रथम क्रमांक मिळाल्याबद्दल अध्यक्ष पाटील, उपाध्यक्ष विठ्ठलराव खोराटे व संचालक मंडळ यांचा सत्कार करण्यात आला.
 

सभेस सर्व संचालक, व्यवस्थापकीय संचालक आर. डी. देसाई, माजी जि. प. सदस्य सत्यजित जाधव, गोकूळचे संचालक विजयसिंह मोरे, शशिकांत पाटील– चुयेकर, बाळ देसाई, केडीसीसीचे संचालक रणजितसिंह पाटील, हुतात्मा वारके सुतगिरणीचे चेअरमन पंडीत केणे, माजी संचालक सुरेशराव सुर्यवंशी, सुनिल कांबळे, भिकाजी एकल, नेताजी पाटील, दत्तामामा खराडे, वसंतराव पाटील, विलास झोरे, रमेश वारके,विकास पाटील – कुरुकलीकर, भुषण पाटील, फिरोजखान पाटील, विकास पाटील, दिनकर कोतेकर, सर्जेराव देसाई, विश्वनाथ कुंभार, रामराव इंगळे, एकनाथ चव्हाण, शामराव देसाई, आर. व्ही. पाटील, धोंडीराम वारके यांच्यासह कारखाना कार्यक्षेत्रातील सभासद मोठ्या संखेने उपस्थित होते.
 

स्वागत व विषय पत्रिकेचे वाचन कार्यकारी संचालक के. एस. चौगले यांनी केले. मागील सभेचे प्रोसिडींग वाचन सेक्रेटरी एस. जी. किल्लेदार यांनी केले. आभार उपाध्यक्ष विठ्ठलराव खोराटे यांनी मानले. राष्ट्रगीतानंतर सभेचा समारोप झाला.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks