ताज्या बातम्या

बिद्री येथील शांती हॉस्पीटल मध्ये मोफत नेत्र तपासणी शिबीर पार

बिद्री/प्रतिनिधी : अक्षय घोडके        

        सांगली येथील टेके क्लिनीक अंतर्गत बिद्री ता.कागल येथील डॉ.तानाजी हरेल यांच्या शांती हॉस्पीटल मध्ये मोफत नेत्र तपासणीस शिबीर घेण्यात आले. या शिबीराचे उद्घाटन पं.स.सभापती मा.जयदिप पोवार , बिद्री ग्रामविकास अधिकारी मा.बी.के.कांबळे ,श्री.भाऊ पाटील, डॉ.तानाजी हरेल यांच्या हस्ते झाले.

              यावेळी बोलताना जयदिप पोवार म्हणाले शांती हास्पीटलचे डॉ.हरेल यांनी कोविड काळात केलेले काम हे उल्लेखनीय होते त्याच बरोबर त्यांनी हॉस्पीटल मार्फत गोरगरीबा साठी केलेले काम कौतुकस्पद आहे . डॉ हरेल म्हणाले या शिबीरामध्ये डोळ्यांचे अचूक निदान मोफत शस्त्रक्रिया सुविधा देण्यात येणार असल्यामूळे वेळेची व आर्थिक बचत देखील होणार आहे .

         या शस्त्रक्रिया सांगली मधील टेके क्लिनिक मध्ये महात्मा जोतीबा फुले योजने अंतर्गत तिरळेपणा,बुबुळ बदलणे,पापणीच्या शस्त्रकिया , डोळ्यातील मास काढणे. अशा विविध शस्त्राक्रिया मोफत केल्या जाणाऱ आहेत त्याच बरोबर मोतीबिंदु , काचबिंदू व लासरू या शस्राक्रिया अल्प दरात केल्या जाणार आहे . अशी महिती आरती खांडेकर यांनी दिली.यावेळी डॉ.तानाजी हरेल, ग्रा पं. सदस्य सौ.शोभा चौगले, डॉ.आरती खांडेकर , सतिश थोरात ,  राजेंद्र चौगले, नारायण पाटील. आदी उपस्थित होते .

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks