बिद्री येथील मौनी स्पोर्ट्सच्या वतीने शिवजयंती उत्साहात

बिद्री प्रतिनिधी अक्षय घोडके ता. २२ :
मर्दानी खेळ,छत्रपती शिवाजी महाराजांच्या वर आधारित भव्य दिव्य असा सजीव देखावा , पारंपरिक वाद्यांचा गजरात मिरवणूक, पोवाडे आदी विविध कार्यक्रमांनी बिद्री, ता. कागल येथील मौनी स्पोर्ट्सच्या वतीने छत्रपती शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

यावेळी डॉ. तानाजी हरेल यांनी मौनी स्पोर्टस्च्याकार्याचा आदर्श घेऊन शिवजयंती साजरी केल्यास निश्चितच छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार समाजापुढे जातील, असे सांगितले. यावर्षी छत्रपती शिवाजी महाराजांवर आधारित भव्य असा सजीव देखावा सादर करण्यात आला. त्याचे उद्घाटन डॉ. तानाजी हरेल, सदस्य सागर काबळे, पांडुरंग कळमकर यांच्या हस्ते करण्यात आले. सागर कांबळे म्हणाले, मंडळाकडून होतकरू गरीब विद्यार्थ्यांना मदत करून शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी त्यांना लागणारी मदत करण्याचा आमच्या मंडळाचा मानस आहे. यावेळी अध्यक्ष मयुर पाटील, उपाध्यक्ष आकाश वारके उर्फ भाऊ,सचिव सचिन बजंत्री , खजानिस सचिन खोत,अक्षय पोवार,अक्षय नाटले नितीन पवार अनिकेत कोरे केतन आरेकररोहित परीट यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.