उपयोजित कला विभागातून बिद्री गावचे सुपुत्र मणिपद्म हर्षवर्धन MFA मध्ये प्रथम

बिद्री प्रतिनिधी अक्षय घोडके
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा युनिव्हर्सिटी मधून रा. शि. गोसावी, कलानिकेतन महाविद्यालयातील अप्लाइड आर्ट विभागाचे प्राध्यापक बिद्री गावचे सुपुत्र श्री.मणिपद्म हर्षवर्धन हे मास्टर ऑफ फाईन आर्ट (MFA) अप्लाइड आर्ट विभागातून सन २०२२ या वर्षांमध्ये डिस्टिन्शन मध्ये प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाले. त्यांचा प्रॅक्टिकलचा विषय इलेस्ट्रेशन हा असून त्यांनी “काही व्यक्त होणाऱ्या भिंती” या विषयावर प्रबंध सादर केला. गेली दोन वर्षे परिश्रम घेऊन त्यांनी हे यश संपादन केले. आपल्याच लहान मुलाने रेखाटलेल्या घरातील भिंती पाहून त्यांना या विषयाची प्रेरणा मिळाली. त्यांचे मार्गदर्शक डॉ. गोविंद पवार यांनीही या विषयाबद्दल संमती दिली. बोलता येत नसताना बाळ आपल्या वेगवेगळ्या हालचालीतून, कृतीमधून व्यक्त होत असते. त्याच्या रेषांमधून तो आपल्याशी काय संवाद साधू पाहतोय याची उकल करणारा हा प्रबंध पालकांना नक्कीच मार्गदर्शक ठरेल. पुढे पी. एच. डी. साठीही हाच विषय पुढे नेण्याचा त्यांचा मानस आहे. प्रॅक्टिकलच्या असाइनमेंट मध्ये प्रथम सत्रापासून विविध प्रयोग त्यांनी केले याचेच हे श्रेय आहे असे डॉ. पवार सर म्हणाले. अल्ट्रा व्हायोलेट लाईटमध्ये चमकणाऱ्या रंगांचा वापर करून, त्यामध्ये प्रयोग करून त्यांनी प्रथम वर्षाचा अभ्यास पूर्ण केला. तर द्वितीय वर्षी ऍसिड अटॅक या सारखा विषय घेऊन क्यू आर कोडचा वापर करून डिझाईन पाहणारा डिझाइन्सशी आता इंटरॅक्टही करू शकेल. हे त्यांनी सिद्ध केले. डे लाईट मध्ये चार्ज होणारे रंग वापरून कल्पक जाहिरात कशी होऊ शकते याचे उत्तम उदाहरण त्यांच्या कामांमधून पाहायला मिळते.
त्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा युनिव्हर्सिटी मधील एच. ओ. डी. डॉ. शिरीष अंबेकर सर, मार्गदर्शक डॉ. गोविंद पवार, डॉ. गजानन पेयरकर याच बरोबर कलानिकेतन महाविद्यालयातील त्यांचे सहकारी प्रा. मनोज दरेकर यांचे सहकार्य लाभले. या यशाचे श्रेय ते आपल्या परिवाराला देतात.
त्यांच्या कामाचा काही भाग पाहण्यासाठी दिलेला क्यू आर कोड नक्की स्कॅन करून पहा.