ताज्या बातम्या

बिद्री व्यापारी असोसिएशन कडून गांधीं जयंती उत्साहात संपन्न

बिद्री/प्रतिनीधी (अक्षय घोडके)

           येथील बिद्री व्यापारी असोसिएशन संघटनेच्या वतीने गांधी जयंती विविध उपक्रमांनी साजरी करण्यात आली. शाळा,सरकारी कार्यालय,मुख्यालय या ठिकाणी स्वच्छतेचे कार्यक्रम घेण्यात आले.यामध्ये व्यापारी संघटनांनीही उस्फूर्त सहभाग घेतला.

              याप्रसंगी बोलताना व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष सुधीर कांबळे म्हणाले, स्वच्छता केल्याने आपले आरोग्य निरोगी राहण्यास मदत होते.तसेच आपल्या भारतीय थोर समाजसुधारकांची जयंती, पुण्यतिथी प्रत्येकांनी साजरी करून त्यांचा आदर्श समाजापुढे ठेवणे आवश्यक आहे.यासाठी आमच्या असोसिएशन कडून समाजापुढे एक नवा आदर्श ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. 

          यावेळी असोसिएशनचे अध्यक्ष, उपाध्यक्ष,सचिव अक्षय पोवार, सागर सुर्यवंशी, सतिश माने, संजय पाटील, दिलीप पोवार , धनाजी साठे, जयसिंग चव्हाण, नामदेव जितकर, अखिल कातकर, रुपेश तराळ, हिंदुराव फराकटे, पांडूरंग चौगले, अजित पाटील, मारूती फराकटे, अनिल गिरी, विनायक माणगावकर , अजित घोरपडे आदी. बिद्री परिसरातील सर्व व्यापारी उपस्थित होते. यावेळी आभार अक्षय घोडके यांनी मानले.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks