बिद्री च्या दूधसाखर प्रशालेस स्वच्छ – सुंदर शाळा’ पुरस्कार
जिल्हास्तरीय तृतीय क्रमांक

निकर न्युज बिद्री प्रतिनिधी : अक्षय घोडके
बिद्री ता. कागल येथील दूधसाखर शिक्षण प्रसारक मंडळाच्या दूधसाखर विद्यानिकेतन व कनिष्ठ महाविलयास सोपानकाका सहकारी बैंक व शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ सासवड येथील संत सोपानकाका फौंडेशन यांचे वतीने शैक्षणिक वर्ष २०२४ – २५ ‘ स्वच्छ व सुंदर शाळा या जिल्हास्तरीय उपक्रमामध्ये पुणे विभागातील उपक्रमशील शाळांमधून कोल्हापूर विभागातून तृतीय क्रमांक जाहिर झाला. जिल्ह्यातील तीन शाळांची यामध्ये निवड झाली आहे.

बिद्री सहकारी साखर कारखाना कार्यक्षेत्रातील अग्रगण्य संकुलांपैकी एक असलेल्या दूधसाखर विद्यानिकेतनने आपल्या गुणवत्तापूर्ण व दर्जेदार शैक्षणिक कार्यातून आजवर अनेक यशस्वी उपक्रम राबवून ग्रामिण भागातील उपक्रमशील प्रशालेचा नावलौकीक अबाधित राखला आहे. शिवाय दूधसाखर विद्यानिकेतन प्रशालेचे पर्यावरणयुक्त स्वच्छ व सुंदर परिसर, भौतिक सुविधा तसेच शैक्षणिक गुणवत्तापूरक वातावरण, यामुळे संत सोपानकाका फौंडेशनने या प्रशालेची निवड केली आहे. दूधसाखर शिक्षण प्रसारक मंडळ बिद्री चे अध्यक्ष मा.आम के. पी.पाटील,उपाध्यक्ष मनोज फराकटे, सर्व संचालक मंडळ, सेक्रेटरी एस.जी. किल्लेदार, पदाधिकारी, यांचे प्रोत्साहन तर प्राचार्य एस. के.खांबे, उपप्राचार्य एच.डी.तिराळे, उपमुख्याध्यापक पी.के . गुरव, पर्यवेक्षक डी. टी. कांबळे, व्होकेशनल विभाग प्रमुख एस. व्ही.कोरवी यांच्या कुशल मार्गदर्शनातून साकार झालेल्या या यशामध्ये सर्व शिक्षक – शिक्षकेतर कर्मचारी, सर्व विद्यार्थी व पालक यांच्या योगदानातून हे यश मिळाले. पारितोषिक वितरण ११ जून २०२५ रोजी पूणे येथे होणार आहे . या यशाबद्दल शाळेचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.