शशिकांत बोंगार्डे ठरला ‘ बिद्री ‘ चा मानधनधारक मल्ल, विविध १४ गटातील विजेते मल्लही बनले मानधनधारक ; चटकदार कुस्त्यांनी फेडले शौकीनांच्या डोळ्यांचे पारणे

बिद्री प्रतिनिधी/ अक्षय घोडके:
बिद्री येथील श्री दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखान्याच्यावतीने आयोजित केलेल्या मानधनधारक मॅटवरील कुस्ती स्पर्धेत खुल्या गटात शशिकांत बोंगार्डे ( बानगे ) यांने प्रतिस्पर्धी उदयराज पाटील ( अर्जुनवाडा ) याच्यावर ६-२ गुणांनी मात करीत नेत्रदीपक विजय मिळवला. तर ७४ किलो गटात साताप्पा हिरुगडे ( बानगे ) यांने प्रतिस्पर्धी पृथ्वीराज पोवार ( तिटवे ) याच्यावर १५-४ गुणांनी मात करीत विजेतेपद मिळवले. विविध १४ वजन गटांत पार पडलेल्या या स्पर्धेतील प्रथम क्रमांकाचे विजयी मल्ल कारखान्याचे मानधनधारक ठरले आहेत.
कारखाना कार्यस्थळावर उभारण्यात आलेल्या माजी आमदार के. पी.पाटील क्रिडानगरीत संपन्न झालेल्या रंगतदार कुस्त्यांनी कुस्ती शौकीनांच्या डोळ्याचे पारणे फेडले. विजेत्या मल्लांना रोख पारितोषिक, सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन कारखान्याचे अध्यक्ष, माजी आमदार के. पी. पाटील, संचालक मंडळ यांच्या हस्ते गौरविण्यात आले. यावेळी पंचक्रोशीतील नामवंत कुस्ती वस्तादांचा सत्कारही करण्यात आला.
वजन गटनिहाय विजेते व उपविजेते असे – २५ किलो : विजेता – कौतुक किल्लेदार ( गंगापूर ), संचित पाटील ( मळगे ), श्रेयस धनवडे ( चांदेकरवाडी ), ३० किलो : विजेता – रितेश मगदूम ( बानगे ), रणवीर सावंत ( सोनारवाडी ), सोहम पाटील ( तिटवे ), ३५ किलो : विजेता – शुभम जठार ( वाघापूर ), नील भारमल ( भडगाव ), समरजीत पाटील ( मांगेवाडी ), ४० किलो : विजेता – आदित्य पाटील ( बानगे ), जीवन मगदूम ( हळदी ), श्रीहरी गिरीबुवा ( चंद्रे ), ४५ किलो : विजेता – प्रथमेश पाटील ( बानगे ), सूर्यकांत माळी ( म्हसवे ), प्रथमेश पाटील ( बाचणी ), ५० किलो : विजेता – प्रणव घारे ( तिटवे ), विनायक तांबेकर ( सोनगे ), प्रथमेश बोंगार्डे ( बानगे ), ५५ किलो गट : विजेता – हर्षवर्धन मेथे ( बानगे ), अंकुश खतकर ( भडगाव ), ऋषिकेश डेळेकर ( मुरगुड ), ६० किलो : विजेता – प्रणव मोरे ( सुरुपली ), सुशांत पाटील ( बानगे ), पवन मेटकर ( खडकेवाडा ).
तर सिनियर ५७ किलो : विजेता – ज्ञानेश्वर शिंदे ( बेलवळे ), रोहित पाटील ( बानगे ), ओंकार महाडेश्वर ( निगवे ), ६१ किलो : विजेता – अमित साळवी ( बानगे ), सोहम पाटील ( तिटवे ), विनायक साबळे ( खेबवडे ), ६५ किलो : विजेता – सुरज अस्वले ( आणूर ), यश पाटील ( बेलवळे ), राजवर्धन महाडेश्वर ( निगवे ), ७० किलो : विजेता – संतोष हिरुगडे ( बानगे ), ओंकार लंबे ( बानगे ), राजवर्धन पुजारी ( मुरगूड ), ७४ किलो : विजेता – साताप्पा हिरुगडे ( बानगे ), पृथ्वीराज पोवार ( तिटवे ), अतुल मगदूम ( इस्पुर्ली ), ७५ किलोवरील खुला गट विजेता : शशिकांत बोंगार्डे ( बानगे ), उदयराज पाटील ( अर्जुनवाडा ),ऋषिकेश पाटील ( बानगे )
यावेळी कारखान्याचे अध्यक्ष, माजी आमदार के. पी. पाटील, संचालक पंडीतराव केणे, राहूल देसाई, रविंद्र पाटील, डी. एस. पाटील, सुनिल सुर्यवंशी, उमेश भोईटे, रावसो खिलारी, फिरोजखान पाटील, संदीप पाटील, रणजीत मुडूकशिवाले, रंगराव पाटील, दिपक किल्लेदार, राजेंद्र मोरे, व्यवस्थापकीय संचालक आर. डी. देसाई, कार्यकारी संचालक के. एस चौगले, सेक्रेटरी एस.जी.किल्लेदार यांच्यासह कारखान्याच्या विविध विभागांचे खातेप्रमुख, पंचक्रोशीतील कुस्ती शौकीन मोठ्या संखेने उपस्थित होते.