ताज्या बातम्यामहाराष्ट्र
इचलकरंजी येथील पालिकेत लाच स्विकारताना शाखा अभियंता बबन खोत लाचलूचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात

इचलकरंजी प्रतिनिधी :
येथील नगरपालिकेच्या नगररचना खात्यातील अधिकारी बबन खोत व त्याचा पंटर यास लाच घेताना कोल्हापूरच्या लाचलुचपत प्रतिबंध खात्याच्या अधिकाऱ्यांनी पकडले. या कारवाईमुळे पालिकेत खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार शहरातील एका नागरिकाने नगर रचना विभागाकडे फाईल दिली होती. हे काम पूर्ण करण्यासाठी संबंधित व्यक्तीकडून रक्कम मागण्यात आली होती. आज पंटरच्या सहाय्याने ही रक्कम संबंधित विभागातील अभियंता घेणार होता. याबाबतची तक्रार संबंधित नागरिकाने लाचलुचपत विभागाकडे केली होती. दुपारी एक वाजण्याच्या सुमारास पालिकेच्या आवारातच ही लाच स्वीकारताना लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी फंटरला रंगेहाथ पकडले यामुळे इचलकरंजी पालिकेत खळबळ उडाली आहे.