ताज्या बातम्यामहाराष्ट्र
भुदरगड तालुका क्रीडा शिक्षक संघटनेच्या अध्यक्षपदी एन. एस. पाटील तर उपाध्यक्षपदी आर. बी. पाटील यांची निवड

गारगोटी प्रतिनिधी :
भुदरगड तालुका क्रीडा शिक्षक संघटनेच्या अध्यक्षपदी नाधवडे हायस्कूल, नाधवडे चे एन. एस. पाटील सर यांची तर उपाध्यक्षपदी दिंडेवाडी हायस्कूलचे आर. बी. पाटील सर यांची निवड करण्यात आली. सचिव पदी कुमार भवन पुष्पनगर चे वाय. बी. मुसाई सर यांची तर खजाणिस म्हणून एक्स. बी. डिसोजा सर कडगाव यांची निवड करण्यात आली.
कार्यकारणी पुढील प्रमाणे – एम. एस. मुसळे, टी एम रेडेकर, एस. व्ही. चौगुले, एम. पी. पाटील, व्ही. बी. भोसले, एम. बी. तोडकर, ए. इ. सावर्डेकर, आर. एन. चव्हाण, पी. एस. सांडुगडे, मनोज देसाई सर व एस पी कासार सर.
या सर्व निवडी तालुका समन्वयक एस. एस. मोरे, माजी अध्यक्ष रेडेकर सर व एम. पी. पाटील सर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडल्या.