शासनमान्य पारोळा तालुका ग्रंथालय संघाची कार्यकारणीची बिनविरोध निवड जाहीर; तालुकाध्यक्ष पदी सुनील देवरे तर कोषाध्यक्ष पदी सुकलाल पाटील यांची वर्णी

पारोळा प्रतिनिधी :
पारोळा तालुका ग्रंथालय संघातर्फे आयोजित बैठकीस नाशिक विभागीय अध्यक्ष नानासो.प्रा.डॉ.दत्ता परदेशी साहेब यांच्या अध्यक्षतेखाली व माजी विभागीय अध्यक्ष बापूसो.संभाजी पगारे यांच्या मार्गदर्शनाने शासनमान्य पारोळा तालुका ग्रंथालय संघाची पहिलीच कार्यकारणीची निवड करण्यात आली.
तालुका अध्यक्ष पदासाठी हनुमंतखेडे येथील सुनील देवरे यांचा एकमात्र अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली तर कार्याध्यक्ष जगदीश भागवत सर रत्नापिंप्री, उपाध्यक्ष हितेश गुलाबराव पाटील टोळी,सचिव संकेत मोरे टेहू, कोषाध्यक्ष पदी सुकलाल पाटील चिखलोद , जेष्ठ सल्लागार म्हणून नानासो. डॉ.शांताराम पाटील मोंढाळेपिंप्री ,मा.बापूसो.डिगंबर पाटील शेवगे, बागुल सर बहादरपूर यांची तर सदस्यपदी रविंद्र पाटील पारोळा, नंदकुमार बडगुजर बहादरपूर , सुधाकर पाटील यांची एक मताने निवड करण्यात आली.
या बैठकिसाठी धुळे जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष अतुल सोनवणे धुळे जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष रोहीदास हाके नाशिक विभागीय कोषाध्यक्ष मा.सतीष पाटील विभागीय संघाचे सदस्य अविनाश भदाणे जळगाव जिल्हा ग्रंथालय संघाचे कार्यवाहक संजय पाटील पारोळा येथील आयडीएल इंग्लिश स्कूलचे संस्थापक अध्यक्ष मा.डॉ.नानासो. शांताराम पाटील साहेब, मा.बापूसो. डिगंबर पाटील शेवगे,बोहरा ता.अमळनेर ग्रंथालय अध्यक्ष मा.अहिरेसर,शिरूड ता.अमळनेर ग्रंथालय अध्यक्ष शशिकांत पाटील, सदर बैठकीत ग्रंथालयाच्या बाबतीत विविध अडचणी संदर्भात मान्यवरांनी सविस्तर मार्गदर्शन केले तर तालुका अध्यक्ष सुनील देवरे यांनी पुढील तिन वर्षांत वाचक आणि ग्रंथालय हिताकरिता कोणते कार्य करणार याबाबतीत सांगितले.
यावेळी आलेल्या मान्यवरांच्या हस्ते नवनियुक्त कार्यकारणी सदस्यांचा सत्कार करण्यात आला.या बैठकीला तालुक्यातील सर्व ग्रंथालय संचालकांची मोठ्या प्रमाणात उपस्थित होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुकलाल पाटील यांनी केले तर आभार किशोर पाटील जोगलखेडे यांनी मानले.