गारगोटी मध्ये नेमकं चाललय काय? राजेंद्र चिले यांना मारहान झाल्याचा गुन्हा भुदरगड पोलीस स्टेशनला नोंद

गारगोटी प्रतिनिधी :
राजकिय वादातून काल गारगोटी येथे झालेल्या मारामारीत परस्पर विरोधी फिर्यादी दाखल झाल्या आहेत. मच्छिंद्र मुगडे यांना काल दुपारी झालेल्या मारहानीनंतर लगेच इंजूबाई मंदिराजवळ आर्या टी स्टॉल येथे झालेल्या मारहानीत राजेंद्र विलास चिले वय ४६ यांना काठीने तसेच लाथाबुक्यांनी मारहान झाल्याचा गुंन्हा भुदरगड पोलीस स्टेशनला नोद झाला आहे. या गुन्ह्यातील फिर्यादी राजेंद्र चिले हे या वेळेस गारगोटी हायस्कूलकडे कामानिमित्य मोटारसायकलीवरुन जात असताना आर्या टि स्टॉल समोर आरोपी मच्छिंद्र मुगडे, शशिकांत वाघरे, सुशांत माळवी, स्वप्नील अशोक साळोखे, जितेंद्र सुरेश भाट, रोहित इंदूलकर, सचिन भांदिगरे, सुरेश पांडुरंग देसाई सर्व रा गारगोटी यांनी फिर्यादी जवळ येवून आक्रोश मोर्चा बघून तुझी मस्ती जिरली की नाही? असे म्हणून शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली.
आरोपी मच्छिंद्र मुगडे याने हातातील धारधार हत्याराने मारण्याचा प्रयत्न केला तो वार फिर्यादीने चुकविला. त्याच वेळी आरोपी जितेंद्र सुरेश भाट याने हातातील काठीने पाठीत मारहान केली व इतरांनी शिविगाळ करून लाथाबुक्याने मारहान केली. अशा वर्णनाचा गुन्हा काल रात्री भुदरगड पोलीस स्टेशनला नोंद झाला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरिक्षक अमित देशमुख हे करत आहेत.
गारगोटी मध्ये नेमकं चाललय काय?
मेघोली धरण फुटीनंतर भुदरगड तालुक्यातील राजकीय वातावरणाने वेगळे वळण घेतले असल्याचे दिसून येत आहे. शिवसेना विरुद्ध इतर पक्ष असा संघर्ष गारगोटी मध्ये दिसत आहे. काल पोलीस अधिकाऱ्यांनी दोन्ही बाजूच्या नेते व कार्यकर्त्यांची भेट घेऊन शांततेचे आवाहन केले आहे. त्याचबरोबर दोन्ही घटनेचा तपास करून दोषींवर कडक कारवाई करण्यात येईल, अशी ग्वाही देखील दिली आहे. मात्र या राजकीय वादग्रस्त घटनांमुळे सामान्य नागरिकाला एकच प्रश्न सतावत आहे….
“गारगोटी मध्ये नेमकं चाललय काय?”