ताज्या बातम्या
ऐन पावसाळ्यात भोगावती नदी कोरडी

कुडूत्री प्रतिनिधी :
ऐन पावसाळ्यात पूर घेऊन वाहणारी भोगावती नदी एकदम कोरडी पडली आहे.आणि पाण्यावाचून रिकामी रिकामी वाटत आहे.
पावसाळा सुरू झाला की नदी नाले तुडुंब भरून वाहतात.या जुलै महिन्यात तर मोठा मुसळधार पाऊस पडत असतो.अशा वेळी डोंगर माथ्यावरील पडणारे पाणी,धरणातील पडणारे गेटचे पाणी या मुळे नद्या भरून वाहतात. पण ऐन पावसाळा सुरू असून हा पावसाळा आहे की उन्हाळा हेच समजेनासे झाले आहे.कडक ऊन तर आहेच आणि नदीतील पाणी पातळीही कमी जाणवत आहे.ज्या दिवसात नदीचा पूर पहायचा त्या दिवसात नदी कोरी ठणठणीत पहावयास मिळत आहे.