ताज्या बातम्या

आयुष्यात भेटणारी चांगली माणसे हीच खरी शिदोरी : ह. भ. प. मधुकर भोसले ; भारतमाता हायस्कूल शाळेत दहावीच्या विद्यार्थ्यांना सदिच्छा

बिद्री ता. २५ ( प्रतिनिधी अक्षय घोडके) :

शालेय दशेत भेटणारी माणसे खुप काही अनुभव देवून जातात. हे अनुभव आयुष्य जगताना उपयुक्त ठरतात. या काळात भेटलेली ही माणसे म्हणजेच आयुष्याची खरी शिदोरी असतात, असे प्रतिपादन कौलगेच्या परिवर्तन सामाजिक संस्थेचे कार्यवाह व संत साहित्याचे अभ्यासक ह. भ. प. मधुकर भोसले यांनी केले.

                       बिद्री ( ता. कागल ) येथील भारतमाता हायस्कूल या शाळेत आयोजित दहावीच्या विद्यार्थ्यांना निरोप व सदिच्छा समारंभावेळी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक एस. पी. पाटील होते.

                      मुख्याध्यापक एस. पी. पाटील म्हणाले, आयुष्याला आकार देणाऱ्या शिक्षकांपेक्षा मोठा गुरु नाही. शिकून कितीही मोठे झालो तरी गुरुजनांप्रती विनम्रता भाव जपायला हवा. उत्तम चारित्र्याचा विद्यार्थी ही त्या शाळांची व शिक्षकांची खरी ओळख असते म्हणून ती जपण्याचा आयुष्यभर प्रयत्न केला पाहीजे.

                        यावेळी सी. डी. कुंभार, एम. जी. फराकटे, टी. आर. पाटील, सौ. जी. ए. डिगरे, सौ. एस. एस. फराकटे, व्ही. आर. कुंभार, एस. एस. माजगावकर, एस. एम. पाटील, आर. व्ही. चौगले, व्ही. डी. वारके, सतीश चव्हाण, अनिल कांबळे, राजेंद्र वारके यांच्यासह विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते. सूत्रसंचालन सई चौगले हिने केले तर आभार जान्हवी कांबळे हिने मानले.

 बिद्री : येथील भारतमाता हायस्कूल शाळेत सदिच्छा समारंभावेळी बोलताना ह. भ. प. मधुकर भोसले.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks