मुरगूड मध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी

मुरगूड प्रतिनिधी : विजय मोरबाळे
महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती संपूर्ण देशभरामध्ये मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. मुरगूड शहरामध्ये सुद्धा ही जयंती मोठ्या उत्साहात करण्यात आली. मुरगूड येथील शिवतीर्थ येथे शिवभक्त, समाजसेवक, शहरातील आजी माजी नगरसेवक , शहरातील नागरिक यांच्या वतीने भीम जयंती साजरी करण्यात आली. यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला दलितमित्र प्रा. एकनाथ देशमुख यांच्या हस्ते पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले.यावेळी उपस्थितांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचा जयघोष केला.
यावेळी प्रास्ताविकामध्ये बोलताना ओंकार पोतदार म्हणाले , आज शिवतीर्थवर भीमशक्ती आणि शिवशक्ती यांचा संगम पहावयास मिळाला आहे.शिवभक्त आणि भीमसैनिक मोठ्या संख्येने महामानवाची जयंती साजरी करण्यासाठी एकत्र आल्याचे पाहून खूप आनंद होत आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा आदर्श घेऊन मुरगूड शहरातील प्रश्न सोडवण्यात सर्वजण पुढाकार घेतील यात शंका नाही.
यावेळी सामाजिक कार्यकते अनिल सिद्धेश्वर , विशाल भोपळे, यांनी मनोगते व्यक्त केली. कार्यक्रमाचे स्वागत प्रास्ताविक ओंकार पोतदार यांनी तर आभार शिवभक्त सर्जेराव भाट यांनी मानले.
यावेळी माजी नगरसेवक एस. व्हि.चौगुले , माजी उपनगराध्यक्ष जयसिंग भोसले, माजी नगरसेवक दत्ता मंडलिक,मारुती कांबळे ,कोतवाल सीताराम कांबळे, स्वच्छता निरीक्षक अमर कांबळे, मयूर आंगज,प्रशांत सिद्धेश्वर, शिवभक्त धोंडीराम परीट,संजय घोडके, स्वच्छता मुकादम दिलीप कांबळे, समाजवादी प्रबोधिनीचे बबन बारदेस्कर, राजेंद्र कांबळे,सुशांत सिद्धेश्वर, प्रकाश परिसवाड,अजिंक्य अर्जुने ,अरुण मेंडके,अमित कांबळे, शहाजी कांबळे,पंकज मेंडके,जीवन कांबळे,शहाजी कांबळे ,अनिल कांबळे, दत्तात्रय कांबळे ,महेश कांबळे, मनोहर कांबळे यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.