ताज्या बातम्यामहाराष्ट्र

श्री जोतिबा देवाच्या उन्मेष अश्वाचे निधन ; भाविक, ग्रामस्थ गहिवरले

कोल्हापूर प्रतिनिधी :

दख्खनचा राजा श्री जोतिबा देवाचा उन्मेष नामक अश्वाचे बुधवारी ४ वाजता निधन झाले. सकाळपासून अश्वला थकवा, अशक्तपणा दिसून येत होता. यासाठी देवस्थान समितीचे व्यवस्थापक दीपक म्हेतर यांनी पशु वैदकीय अधिकाऱ्यांना बोलावून तात्काळ त्याच्यावर उपचार सुरू केले होते. मात्र, दुपारी चारच्या सुमारास हृदयविकाराच्या झटक्याने या अश्वाचे निधन झाले.

उन्मेष या नाथांच्या अश्वाला हिम्मत बहादूर चव्हाण सरकार यांच्याकडून २०१२ साली देण्यात आले होते. यावेळी साधारण नऊ महिन्याचा हा अश्व होता. आजअखेर या अश्वाने दहा वर्षे नाथांच्या सेवेत घालवले होते.

अश्वाच्या निधनाचे वृत्त समजताच डोंगर परिसरातील भाविक व नाथभक्तांनी डोंगरावर धाव घेतली. नाथांच्या अश्वाचे अंतिम दर्शनसाठी जनसमुदाय लोटला होता. दक्षिण दरवाजा या ठिकाणी या अश्वाचे अंतविधी करण्यात आले. यावेळी केदार्लिंग देवस्थान समितीचे कर्मचारी, पुजारी, गावकर प्रतिनिधी, ग्रामस्थ, भक्त उपस्थित होते

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks