बेळगांव : इन्स्टाग्रामवर छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणारी पोस्ट; एकावर गुन्हा दाखल.

बेळगाव :
बेळगावमध्ये शिवाजी महाराजांचा अपमान करणारी पोस्ट इंस्टाग्राम अपलोड करण्यात आलेली होती. शिवाजीची मान मोडून कन्नड देशाचा ध्वज मल्लमाने फडकवला होता असा आशय या पोस्ट मध्ये होता. या पोस्टमुळे बेळगाव परिसरासह सीमाभागात संतापचे वातावरण निर्माण झाले आहे.
ही पोस्ट करणाऱ्या विरुद्ध बेळगाव खडेबाजार पोलीस स्थानकात आता एफआयआर दाखल करण्यात आलेली आहे.
View this post on Instagram
आपण चित्र बघतोय त्यामध्ये बेळवडीची मल्लम्मा अस या राणीचं नाव असून शिवाजी महाराज त्यांच्या पायापाशी असलेली पोस्ट इंस्टाग्राम वरतीं पोस्ट करण्यात आलेली होती.
इतिहास पाहता शिवाजी महाराजांच्या सैन्याने दक्षिण स्वारीवरुन परताना तीच्या बेलवडीच्या राणीच्या प्रदेशावर हल्ला करुन ते ताब्यात घेतले होते.. त्यानंतर शिवाजी महाराजांनी तीचा प्रदेश परत करुन तीला साडीचोळी देऊन सन्मानित केल होत..व शिवाजी महाराज्यांनी स्वतःच्या मांडीवर बसून राणीच्या लहान बाळाला दुध पाजवले होते तसा पुतळा आज ही बेलवडीत आहे..शिवाजी महाराजांनी मल्लमा राणीला बहीण मानलं होतं.
पण या पोस्टमुळे सध्या शिवप्रेमी मध्ये संतापाच वातावरण निर्माण झालेलं आहे.