श्रीक्षेत्र मेतके येथील बाळूमामांचा रणखांब दर्शनासाठी श्रावण महिन्यात खुला

मुरगूड प्रतिनिधी : विजय मोरबाळे
कागल तालुक्यातील मेतके येथे श्री. सद्गुरू बाळूमामांनी आपले मूळ शक्तीस्थान निर्माण करून भक्तांच्या इडा-पिडा दूर व्हाव्यात म्हणून सन १९३२ साली १४ फुट उंचीचा रणखांब स्वतःच्या हस्ते मंडपात रोवला.
सालाबाद प्रमाणे श्रावण महिन्यात यावर्षी श्रावण शुद्ध ०१, शुक्रवार दि.२५/०७/२०२५ पासून भाद्रपद शुद्ध ०२, सोमवार दि. २५/०८/२०२५ पर्यंत भक्तांच्या दर्शनासाठी रणखांब वरील पंच धातूचे आवरण काढून मूळ रणखांब खुला करण्यात येत आहे. तरी भाविकांनी दर्शनाचा लाभ द्यावा.असे आवाहन श्री. सद्गुरू बाळूमामा चॅरिटेबल ट्रस्ट मूळक्षेत्र मेतके यांचेवतीने करण्यात आले आहे.
सद्गुरू बाळूमामा यांचे मूळक्षेत्र म्हणून प्रसिद्ध असलेल्या कागल तालुक्यातील मेतके येथील श्री. हालसिद्धनाथ-बाळूमामा मंदिरात स्वतः बाळू मामानीच रोवलेला रणखांब श्रावण महिन्याच्या निमित्ताने महिनाभर दर्शनासाठी खुला करण्यात येत आहे.
रणखांबाची विधिवत पूजा व अभिषेक होणार आहे
स्वतः बाळूमामा यांनीच १९३२ मध्ये भक्तांची ईडा पिडा कमी व्हावी, या उद्देशाने हा १४ फूट उंचीचा रणखांब रोवल्याने याला भक्तांमध्ये वेगळे स्थान आहे. ‘एक खांब कैलासात व दुसरा मेतक्यात..!’ असे याबाबत बाळूमामा म्हणत. हा खांब खराब होवू नये, यासाठी सद्गुरू बाळूमामा ट्रस्टने त्याच्या सभोवती पंचधातूचे आवरण केले आहे. हेच आवरण काढून मूळ रणखांब भाविकांना दर्शनासाठी केवळ श्रावण महिन्यात म्हणजे तो दर्शनासाठी खुला राहणार आहे.