ताज्या बातम्यामहाराष्ट्र
धनंजय मुंडे यांना दुसऱ्यांदा कोरोनाची बाधा

ऑनलाईन टीम मुंबई:
महाराष्ट्रात पुन्हा एकदा कोरोनाने डोके वर काढले आहे.रुग्ण संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे अनेक शहरात लॉकडाऊन जारी करण्यात आले आहे. त्यातच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना पुन्हा एकदा कोरोनाची लागण झाली
आहे. त्यांनी स्वतः याबाबत ट्विट करत माहिती दिली.दरम्यान, काही महिन्यांपूर्वीही धनंजय मुंडे कोरोना बाधित झाले होते. त्यावेळी उपचार घेत मुंडे यांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली होती.