साविञीबाई फुले जयंती सप्ताह निमित्त धामोड मध्ये जनजागृती फेरी

राधानगरी प्रतिनिधी : प्रतिश पाटील
सह्याद्री हायस्कूल व ज्युनि.काॅलेज धामोड ता.राधानगरी या विद्यालयाच्या वतिने क्रांतिज्योती ,मुख्याध्यापीका , स्ञिशिक्षणाची जीवनदायीनी ,जीच्यामुळे आजच्या स्ञिला शिक्षणाचे दरवाजे खुले होवून ती अवकाशात ऊंच फिनीक्स पक्षाप्रमाणे भरार्या घेण्यास शिकली अशा स्ञिशिक्षणाच्या ऊध्दारकर्त्या साविञिबाई फुले यांच्या जयंती निमित्त जनजागृती फेरी धामोड येथे काढण्यात आली.
या जनजागृती फेरीची तयारी विद्यालयाचे ऊपक्रमशिल शिक्षक आर .जी.पाटील व व्ही . के . पाटील यांनी नेटके नियोजन केले होते.
यावेळी सर्व प्रशालेतील विध्यार्थी व विध्यार्थ्यानी विविध वेशभुषेतून आले होते . त्यांचे स्वागत मुख्याध्यापक एस. एल .ऊगारे यांनी केले .
तर पर्यवेक्षक दादासाहेब मालप यांनी साविञीबाई फुले यांच्या विषयी माहिती दिली . जनजागृती फेरीचे महत्व समजावून सांगीतले .
यावेळी साविञिबाई फुले , झाशिचीराणी , इंदिराजी गांधी , भारत माता , जोतिबा फुले , पंडित नेहरू , शिवराय , या वेषभूशेचे परिक्षण करणेत आले आणि विध्यार्थ्यामध्ये देशभक्ती जागृत करण्याचे काम या वेषभूशेतून करण्यात आले.
ही जागृती फेरी ग्रामपंचायत धामोड या ठिकाणी नेण्यात आली व तेथे कु.प्रमिला खोत या विद्यार्थिनीचे साविञिबाई फुले यांच्या विषयी भाषण होवून सदर जनजागृती फेरीची सांगता के.डी.सी.सी.बॅंकेजवळ बाजार पेठेत झाली .
यावेळी प्रशालेचे जिमखाना प्रमुख व्हि, के. पाटील , आर ,जी,पाटील, एस.व्ही .कांबळे, आर ,जी. पेंढारी, आर. एस. इंगळे , ए.एम , लाड. पी. एल. पाटील. आर.बी.लाड. , अजित राणे , प्रकाश गोंधळी ,सर्व शिक्षक वृंद विध्यार्थि व विध्यार्थिनी उपस्थित होते .
या जनजागृती फेरीचे सुञसंचालन कु. रसिका अरविंद पाटील हिने केले.तर आभार कु. स्नेहल तळेकर हिने मानले ,
अशा विविध स्पर्धा होवून हा क्रांतिज्योती साविञिबाई फुले जयंती सप्ताह मोठ्या दिमाखात सपन्न झाला.