सामाजिक कार्यकर्त्या रेश्मा खाडे यांना “विवेक जागर साथी” पुरस्कार प्रदान

कोल्हापूर :
विवेक जागर मंचच्या वतीने चिरंतन स्वाती कृष्णात यांच्या वाढदिवसानिमित्त दिला जाणारा “विवेक सागर साथी” पुरस्कार या वर्षी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्या रेश्मा खाडे (राधानगरी) यांना प्रदान करण्यात आला.
मानवता केंद्रित समाज उभारण्याकरिता परिवर्तनवादी चळवळीत स्वातंत्र्य समता बंधुता धर्मनिरपेक्षता णि वैज्ञानिक दृष्टिकोन जनमानसात घडविण्याकरिता काम करणार्या सामाजिक कार्यकर्त्यांना हा पुरस्कार दिला जातो.
डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांच्या खुनानंतर अंधश्रद्धा निर्मूलनाच्या चळवळीत सहभागी झालेल्या रेश्मा खाडे या आजपर्यंत अंधश्रद्धा निर्मूलन चे काम अगदी निरपेक्ष भावनेने करत आहेत.
होळी लहान करा होळी – दान करा पोळी, फटाकेमुक्त दिवाळी, शालेय पातळीवर शिक्षक आणि विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजविणे असे उपक्रम राबवीत असताना व्यसनमुक्ती अभियान, संविधान जागर अशा कामात त्या संघटनेचे प्रतिनिधित्व करत आल्या आहेत.
केवळ बोलके सुधारक न राहता त्यांनी आपल्याला पटलेली विचार स्वतःच्या आणि कुटुंबाच्या आचरणात आणले आहेत त्यांच्या या सर्व वाटचालीत संपूर्ण कुटुंबाचा त्यांना पाठिंबा मिळत राहिला आहे.
या सर्व त्यांच्या कार्यामुळे त्यांना हा पुरस्कार देत असल्याचे निवड समितीचे स्वागत कार्याध्यक्ष सुनील स्वामी यांनी सांगितले.
यावेळी उमेश सूर्यवंशी, श्रीधर पाटील तहसिलदार, प्रा. चन्द्रशेखर कांबळे, स्वाति कृष्णात, चिरंतनी, सारिका पाटील, मनीषा पाडळकर, याकुब बक्षू शाबिरा आरिफ शेख आदी. उपस्थित होते.