कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लालपरी घेतेय विश्रांती!

कुडूत्री प्रतिनिधी : सुभाष चौगले
राज्य परिवहन महामंडळाची लालपरी म्हणजे एस. टी.बस कोरोनाच्या महामारिमुळे सलग दुसऱ्या वर्षी विश्रांती घेत आहे.त्यामुळे शासनाला करोडो रुपयांच्या नुकसानीला सामोरे जावे लागत आहे.अगदी ग्रामीण वस्ती पर्यंत पोहचलेली व सुरक्षित सेवा देणाऱ्या लालपरीला पुन्हा एकदा आणि सलग दुसऱ्या वर्षी विश्रांतीला सामोरे जावे लागत आहे.
मागील वर्षी भारतात मार्च महिन्यात कोरोनाने शिरकाव केला.या महामारीचा उद्रेक होताच शासनाला या लालपरीच्या प्रवासामधून कोरोनाचा धोका होऊ नये व जनता सुरक्षित रहावी यासाठी वाहतूक बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. आणि तो हितावह देखील आहे.
ग्रामीण भागा बरोबरच शहरी भागात सेवा देणारी लालपरी अनेक दिवसांपासून दिसत नाही.पण अनेकांना प्रवास देणाऱ्या या लालपरीला या कोरोना काळात प्रवास देण्यापासून वंचित राहावे लागत आहे.आणि तीच्यावाचून रस्ते सुनसान देखील दिसत आहेत.
कोरोनाने या महामारीमुळे मोजदाद न होण्यासारखे नुकसान झाले आहेच.पण दररोज सेवा देणाऱ्या व दररोज आर्थिक उत्पन्न मिळवून देणाऱ्या लालपरीला विश्रांती घ्यावी लागत आहे.त्यामुळे महामंडळाला आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागत आहे.
लवकरात लवकर कोरोनाची महामारी नाहीशी होऊन पुन्हा एकदा लालपरी प्रवाशांच्या सेवेत दाखल व्हावी अशी अपेक्षा प्रवाशी वर्गाची आहे.