ताज्या बातम्यामहाराष्ट्र

सर्वोच्च न्यायालयाच्या ध्वनी प्रदूषणा बाबतच्या नियमांचे उल्लंघन होऊ न देता येणारा गणेशोत्सव आनंदात साजरा करा – डी.वाय.एस.पी संकेत गोसावी

Celebrate Ganeshotsav happily without violating the Supreme Court's rules on noise pollution - Sanket Gosavi or Karveer Sub-Divisional Police Officers

मुरगुड प्रतिनिधी : विजय मोरबाळे

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी सर्वोच्च न्यायालयाच्या ध्वनी प्रदूषणा बाबतच्या नियमांचे उल्लंघन होऊ न देता येणारा गणेशोत्सव आनंदात साजरा करावा .गणेश आगमन व विसर्जन मिरवणुकीमध्ये कोणत्याही प्रकारचा विभत्सपणा नसावा . तरूण मंडळांनी प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करावे असे आवाहन करवीर उपविभागीय पोलीस अधिकारी मा . संकेत गोसावीसो यांनी केले . ते कोल्हापूर जिल्हा पोलीस प्रशासन व मुरगूड पोलीस स्टेशन यांच्या संयुक्तपणे घेण्यात आलेल्या सार्वजनिक गणेश उत्सव मंडळांच्या नियोजनाच्या बैठकीत मार्गदर्शन करतांना बोलत होते .

यावेळी मुरगुड पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विकास बडवेसो, मुरगुड नगरपरिषदेचे कार्यालयीन निरीक्षक रमेश मुन्नेसो , मुरगूडचे मंडल अधिकारी प्रशांत गुरव प्रमुख उपस्थित होते .

मा.संकेत गोसावीसो पुढे म्हणाले, सर्वोच्च्य न्यायालयाचे नियम सर्वांसाठी बंधनकारक असून या नियमांचे उल्लंघन केल्यास पोलिसांना कडक कारवाई करावी लागेल . साऊंड सिस्टिम बाबतचे नियम सर्वांनी पाळावेत .

मुख्यमंत्र्यांनी कार्यक्रम निर्बंध मुक्त केले असले , तरी हे निर्बंध कोरोनाच्या काळातील निर्बंध उठवले असून, ध्वनी प्रदूषणाबाबतचे नियम सर्वांना पाळावेच लागतील . जिल्हाधिकारी साहेबांनी घालून दिलेल्या वेळेच्या बंधनाचे नियम ही सर्वांना पाळावे लागतील . ज्यामध्ये पहिले सहा दिवस रात्री १० वाजेपर्यंत व नंतरचे चार दिवस रात्री १२ वाजेपर्यंत अशा प्रकारची परवानगी जिल्हाधिकारी साहेबांनी दिलेली आहे . त्याचेही उल्लंघन कोणाला करता येणार नाही . याची सर्वांनी दक्षता घ्यावी

मा.बडवेसो आपल्या प्रास्ताविकात म्हणाले, सार्वजनिक गणेशोत्सव हा समाजाच्या हिताचा व्हावा . मंडळांनी गणेश वर्गणी सक्तीची करू नये . तर ती ऐच्छिक असावी . पोलीस प्रशासनाच्या कडून मिरवणूकीची वेळ व मार्ग ठरवले जातील त्याचे पालन मंडळांकडून व्हावे . विधायक कार्यक्रमांचे आयोजन करून मंडळांनी सामाजिकता जोपासावी असे आवाहन केले .

प्रातिनिधिक स्वरूपात तरुण मंडळाचे प्रतिनिधी म्हणून ओंकार पोतदार मुरगुड , एकनाथ पाटील भडगांव, अशोक चौगले मुरगुड यांनी मनोगत व्यक्त केली .

याप्रसंगी मुरगूड पोलिस स्टेशनचे  श्री संदीप ढेकळे यांनी डेसिबल कसे मोजतात, डॉल्बीच्या आवाजासंबंधी कोणती दक्षता घ्यावी , ध्वनी प्रदूषणाचे नियम काय आहेत . याबाबत मशीनव्दारे उपस्थितांना प्रात्यक्षिक दाखवून मार्गदर्शन केले .

या नियोजनाच्या बैठकिस मुरगूड पोलीस स्टेशनच्या कार्यक्षेत्रातील ३०० पेक्षा जास्त मंडळांचे प्रतिनीधी उपस्थित होते .

गतवर्षी प्रशासनाच्या आव्हानाला प्रतिसाद देत एक गाव एक गणपती असा आदर्श उभा करणाऱ्या गावांच्या मंडळांना सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. यामध्ये सदा हसन कला क्रीडा मंडळ बेलेवाडी काळम्मा , न्यू गणेश तरुण मंडळ आलाबाद ,भावेश्वरी गणेशोत्सव मंडळ ठाणेवाडी ,आदर्श गणेश तरुण मंडळ जैन्याळ , शिवराजे तरुण मंडळ करड्याळ , अष्टविनायक तरुण मंडळ बाळीग्रे , चॅलेंज ग्रुप फराकटेवाडी ,गणेश तरुण मंडळ चौंडाळ , श्री शिवाजी गणेश तरुण मंडळ बिद्री , यांचा समावेश होता .

गतवर्षी कोरोनाच्या काळामध्ये कोरोना योद्धा म्हणून कार्यरत असणाऱ्या मेतके, लिंगनूर , बाळीग्रे , सावर्डे, यमगे, बेनिग्रे, तमनाकवाडा, करड्याळ , बोरवडे, मांगनूर, आदी गावच्या पोलीस पाटीलांचा यावेळी सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला
कार्यक्रमाचे स्वागत मुरगूडचे उप पोलीस निरीक्षक कुमार ढेरे यांनी , तर प्रास्ताविक ए पी आय विकास बडवे यांनी केले . सूत्रसंचालन प्रा अनिल पाटील यांनी तर आभार पोलीस उपनिरीक्षक राहुल वाघमारे यांनी मानले .

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks