ताज्या बातम्यामहाराष्ट्र

वारकरी परंपरा बळकट करणारा मुरगूड मधील अष्टमी महोत्सव अष्टमी महोत्सवाचे शंभरावे वर्ष पाटील कुटुंबियांचे वेगळेपण

मुरगूड प्रतिनिधी : विजय मोरबाळे

स्वातंत्र्यपूर्व काळापासून वारकरी परंपरा बळकट करण्यासाठी मुरगूड ता.कागल येथील पाटील कुटुंबीयांनी सुरू केलेल्या अष्टमी महोत्सवाचे शंभरावे वर्ष आहे.या उत्सवात आठ दिवस राज्यातील विविध प्रवचनकार,किर्तनकारांची हजेरी आणि समाजप्रबोधन यामध्ये आतापर्यंत कधीच खंड पडला नाही.अखंडित पणे उत्साहात पार पडणार हा श्रीकृष्ण अष्टमी महोत्सव हा पाटील घराण्याचे वेगळेपण आहे.यावर्षी मात्र कोरोना मुळे कोणतेही धार्मिक कार्यक्रम पार पडणार नसल्याचे माजी नगराध्यक्ष प्रविणसिंह पाटील यांनी सांगितले.
मुरगूड शहराच्या नगराध्यक्ष पदी सर्वात अधिक काळ काम केलेले माजी नगराध्यक्ष विश्वनाथराव पाटील व पहिले नगराध्यक्ष विठ्ठलराव पाटील यांचे आजोबा भाऊसाहेब पाटील यांनी सन १९२० ला मुरगूड मध्ये कृष्ण भक्ती बळकट करण्यासाठी अष्टमी उत्सव सुरू केला.सुरवातीस काही वर्षे जिजो महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली प्रवचन कीर्तन सुरू झाले.मर्यादित असणारा उत्सवा मध्ये हळूहळू व्यापकता आली.परिसरातील ग्रामस्थ आठ ते दहा दिवस या उत्सवाला हजेरी लावण्यासाठी आपली घरे बंद करून जनावरे आपल्या सोबत घेऊनच मुरगूड ला येत.
अष्टमी उत्सव सुरू झाल्यानंतर विठ्ठलराव आणि हरीभाऊ यांचा जन्म झाला.त्यामुळे या उत्सवाची व्यापकता वाढली.पुढे काही वर्षात मोठं मोठ्या नैसर्गिक आपत्ती आली तरी ही या उत्सवात खंड पडू दिला नाही.१९२५ च्या सुमारास हा उत्सव काही काळ गावाच्या बाहेर साजरा केला गेला.सद्या ही या अष्टमी उत्सवात आठ दिवस राज्यातील प्रमुख प्रवचनकार व कीर्तनकार यांचे कार्यक्रम होतात हजारो भाविक या कार्यक्रमाला हजेरी लावतात.परिसरातील सर्व गावातील भजनी मंडळ या उपक्रमात सहभागी होतात.जन्मकाळा दिवशी संपूर्ण परिसर आकर्षक पद्धतीने सजवला जातो आणि हजारो लोकांना अन्नदान केले जाते.
सद्या वारकरी संप्रदाय बळकट करण्यासाठी या अष्टमी उत्सवाची विना आपल्या खांद्यावर घेऊन माजी नगराध्यक्ष प्रविणसिंह पाटील,दिग्विजय पाटील सत्यजित पाटील, हे अपार प्रयत्न करत आहेत.या वर्षी मात्र कोरोना रोगाच्या प्रसारा मुळे या उत्सव अत्यंत साधेपणाने साजरा होणार आहे.आज २३ ऑगस्ट रोजी मूर्ती पूजा व विना पूजन करून पंचपदी होईल त्यानंतर ३० ऑगस्ट रोजी सकाळी दहा ते अकरा या वेळेत मोजक्या लोकांच्या उपस्थिती जन्मकाळ पुष्पवृष्टी सुंठवडा वाटप होईल आणि ३१ ऑगस्ट रोजी सकाळी नऊ वाजता काल्याचे भजन होऊन सांगता होईल.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks