ताज्या बातम्यामहाराष्ट्र

पाऊस संथ गतीने, पूर ओसरला; प्रशासनाकडून नागरिकांची आरोग्य तपासणी. 

घुणकी :

कोल्हापूरची पंचगंगा व वारणा नदीला महापूर आल्याने या पुराचा फटका नदी काठच्या सर्व गावांना बसला आहे. त्यामुळे गावातील दलित नागरी वस्तीत पुराचे पाणी शिरले होते.आणि तातडीने येथील नागरिकांनी स्थलांतरित केले पाहिजे हे लक्षात येताच ग्राम प्रशासन यांनी येथील सर्व नागरिकांना तत्काळ मराठी शाळेत राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था केलेली होती. त्यामुळे काही स्वयंम सेवाभावी संस्था माणुसकीच्या नात्याने पुढे येऊन या पूरग्रस्त नागरिकांना धीर आणि आधार देण्याचा प्रयत्न सुरू आहे. 

यामध्ये भरारी महिला बहुउद्देशीय सेवा भावी संस्था,मल्हार सेनेचे अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे ( शरदचंद्र पवार गट) जिल्हा उपाध्यक्ष शहाजी सिद यांनी पूरग्रस्त नागरिकांच्या लहान मुलांना खाऊ वाटप केला. तसेच स्थानिक लोकप्रतिनधींनी पूरग्रस्त नागरिकांना मदतीचे आश्वासन दिले. मात्र आता पूर ओसरत आहे.त्यामुळे पूर येऊन गेल्यानंतर जो आरोग्याचा प्रश्न गंभीर होणार आहे.त्यामुळे तेथे राहणाऱ्या सर्व नागरिकांचे आरोग्य घोक्यात जाऊ नये यासाठी येथून पुढे होणाऱ्या रोगाराईला कशा प्रकारे आपण सामोरे जाण्यासाठी आरोग्याची काळजी कशी घ्या आणि त्यांची पूर्व आरोग्य चाचणी आज दि (२९) करण्यात आली.

यावेळी सामुदायिक आरोग्य अधिकारी डॉ ज्योती शिंदे यांनी भेट देऊन सर्वांची तपासणी केली आहे. 

यावेळी आरोग्य सेविका सौ सविता काटकर, व्ही व्ही माने, सर्व अशा स्वयंसेविका इतर कर्मचारी उपस्थित होते.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks