ताज्या बातम्यामहाराष्ट्र
महिला महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्या पदी डॉ. भोसले यांची निवड

सावरवाडी प्रतिनिधी :
करवीर तालुक्यातील कसबा बीड येथील महिला महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्या पदी प्रा. डॉ. एस. एस. भोसले यांची निवड करण्यात आली.
संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. वाय. एन. मेणसे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला महाविद्यालयाची करवीर तालुक्याच्या पश्चिम भागात वाटचाल सुरु आहे. डॉ. भोसले यांनी हिन्दी विषयात शिवाजी विद्यापीठातून पीएच डी केली. सामाजिक स्री परिवर्तन, शैक्षणिक अशा विविध क्षेत्रात त्यांनी उल्लेखनिय काम केले आहे.