गारगोटीच्या कर्मवीर हिरे महाविद्यालयास एम कॉम अभ्यासक्रमाची मंजूरी : विद्यार्थी वर्गातून समाधान

गारगोटी प्रतिनिधी :
गारगोटी येथील श्री मौनी विद्यापीठ अंतर्गत असलेल्या कर्मवीर हिरे महविद्यालयास एम कॉम य पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमास शासनाने मंजूरी दिली आहे अशी माहिती कर्मवीर हिरे महाविद्यालयाचे प्राचार्य पी बी पाटील यांनी दिली.
याविशयीच्या प्रसिध्दी पत्रकात असे म्हटले आहे की, सन २०२१-२२ या नविन शैक्षणिक वर्षापासून कर्मवीर हिरे,कला, शास्त्र, वाणिज्य व शिक्षणशास्त्र महाविद्यालयात एम कॉम हा पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम सुरु होत आहे.या अभ्यासक्रमाला उद्योग, व्यवसाय,बँकिंग,फायनान्स, माहिती तंत्रज्ञान या क्षेत्रात नियमित मागणी आहे.नव्याने मंजूरी मिळालेल्या या अभ्यासक्रमामूळे भुदरगड,राधानगरी, आजरा गडहिंग्लज या तालुक्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना पदव्युत्तर पदवी शिक्षणाची सोय होत आहे.हा अभ्यासक्रम चालू केल्याबध्दल सर्वच महाविद्यालये प्राचार्य डॉ पी बी पाटील व त्यांचा स्टाफ यांचे अभिनंदन करत आहेत.या अभ्यासक्रमाच्या उपविभागात अकौंटिंग, टँक्स, ऑडिट, बिझनेस मँनेजमेंट,इंडस्ट्रियल मँनेजमेंट, फायनान्स या विषयाचा समावेश असल्यामूळे या क्षेत्रात करिअर करणाऱ्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना याचा मोठा लाभ होणार आहे.हा पदव्यत्तर पदवी कोर्स प्रथमच भागामध्ये सुरु होत आहे.यापुर्वी या शिक्षणाची सोय या भागात नसल्याने आजवर हजारो विद्यार्थ्यांचे विद्यार्थींनींचे नुकसान झाले आहे.पण आता यापूढे हा कोर्स गारगोटी च्या के एच कॉलेज ला सुरु झाल्याने भागातील विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
या पदव्युत्तर पदवी शिक्षणाच्या मंजुरीकामी श्री मौनी विद्यापीठ गारगोटीचे अध़्यक्ष नामदार सतेज उर्फ बंटी डी पाटील, संस्था चेअरमन आशिष अनिलपंत कोरगांवकर, विश्वस्थ मंडळ व संचालक डॉ आर डी बेलेकर यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभलेचे प्राचार्य डॉ पी बी पाटील यांनी सांगितले.