राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या चंदगड तालुका अध्यक्षपदी निखिल बांदिवडेकर यांची नियुक्ती

चंदगड प्रतिनिधी :
कोल्हापूर जिल्हा राष्ट्रवादी विद्यार्थी चंदगड तालुका अध्यक्ष पदी निखिल बांदिवडेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या निवडीचे पत्र राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष निहाल कुलावंत यांच्या सहीने देण्यात आले आहे.
निखिल बांदिवडेकर हे नागणवाडी येथील राष्ट्रवादीचे धडाडीचे कार्यकर्ते असून चंदगड तालुक्यात विद्यार्थी काँग्रेसचे चांगले काम करत आहेत.त्यांच्यावर आता तालुक्यातील विद्यार्थ्यांचे प्रश्न समजून अखिल जोमाने काम करण्याच्या उद्देशाने ही जबाबदारी देण्यात आली आहे. लोकाभिमुख सामाजिक कार्याची सर्व समावेशक राष्ट्रवादी विचारधारा जनसामान्यापर्यंत पोहचवून पक्ष श्रेष्ठींनी आपणाकडे सोपवलेली महत्वपूर्ण जबाबदारी पदास अनुसरून सुयोग्य रितीने सांभाळाल तसेच कार्यकत्यांना एकत्र करून त्यांच्या अडी अडचणी अभ्यासपूर्वक पध्दतीने सोडवून त्यांना योग्य न्याय देत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मजबूत कराल असा मला ठाम विश्वास पत्रात व्यक्त करण्यात आला आहे. त्याच्या या निवडीचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.